
सामना ऑनलाईन । कोलकाता
ममता बॅनर्जी या राज्यात रामाचे नाव घेण्यास बंदी घालत आहे असे अमित शहा म्हणाले तसेच रामाचे नाव हिंदुस्थानमध्ये नाही घ्यायचे तर पाकिस्तानमध्ये घ्यायचे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पश्चिम बंगालमधील घाटालमध्ये ते बोलत होते.
Glimpses from a public meeting in Belda, Paschim Medinipur, West Bengal. pic.twitter.com/viU9QhWWWB
— Chowkidar Amit Shah (@AmitShah) May 7, 2019
यंदा राज्यात भाजप 42 पैकी 23 हून अधिक जागा जिंकेल असा निर्धार शहा यांनी व्यक्त केला तसेच “भगवान राम हे हिंदुस्थानी संस्कृतीचे घटक आहेत. त्यांचे नाव घेण्यासाठी कोण अडवू शकतं? मी ममता दीदींना विचारू इच्छितो की जर रामाचे नाव हिंदुस्थानमध्ये नाही घेणार तर मग काय पाकिस्तानमध्ये घेणार का?” तसेच यंदाची निवडणूक ही राज्यात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आहे असेही शहा म्हणाले.


























































