दहशतवाद्यांना घुसून मारले, आता घुसखोरांना हाकलणार! – अमित शहा

2879

कश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून त्यास कुणीही भारतापासून वेगळं करु शकत नाही असे ठाम मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज किल्लारीत आयोजित महायुतीच्या भव्य प्रचार सभेत मांडले.

विरोधकांनी 370 कलम हटवले तर रक्ताचे पाट वाहतील असे म्हणले होते परंतु तिथे साधी गोळी उडाल्याची सुद्धा घटना घडली नाही. इंदिरा गांधींनी देशहितासाठी घेतलेल्या निर्णय यास वाजपेयी समर्थन देत होते तर आता विरोधक आम्हाला पुरावे मागतात. आम्ही आतंकवाद्यांना घरात घूसुन मारले. 2024 पर्यंत देशात एकही घुसखोर राहणार नाही, असे अमित शहा म्हणाले.

एका जवानाच्या बदल्यात 10 मारू, शहांनी सांगलीत भरला हुंकार

ते पुढे बोलताना म्हणाले की, फडणवीस सरकारने चांगले काम केले आहे या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात एकही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे पूर्ण केले नाहीत. देवेंद्र फडणवीस वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे सरकार घराणेशाहीचे सरकार नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रात शेतकरी साठी कृषी मंत्री असून कोणतेही काम केले नाही. ते आम्हाला हिशोब मागतातच कसा? असा आरोप त्यांनी केला व लातूर जिल्ह्यातील सर्व भाजपच्या जागा निवडणूक देण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या