मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर परिस्थिती बिघडली नसती, अमित शहांची कबुली

3863

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकजला उपस्थित राहिलेल्या लोकांनी देशभरात कोरोना पसरवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एप्रिल महिन्यात एक आकडेवारी जाहीर करत देशातील 30 टक्के रुग्ण हे तबलिगी जमातशी संबंधित असल्याचे सांगितले होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील तबलिगींबाबत एक मोठी कबूली दिली आहे.

‘दिल्लीत झालेला तबलिगी जमातचा मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर परिस्थिती बिघडली नसती. मरकजमध्ये वर्षभर कार्यक्रम सुरूच असतात. मरकजमधील कार्यक्रम हा सार्वजनिक नव्हता. तो मरकजच्या आत होणार होता. पण तरिही आम्ही हा कार्यक्रम रोखून तिथल्या लोकांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा द्यायला हव्या होत्या.’, असे त्यांनी आज तकचा खास कार्यक्रम E-एजेंडामध्ये सांगितले आहे. मोदी सरकार 2.0 ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अरे बापरे..! देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

दिल्लीतील निझामुद्दीन शहरात झालेल्या मरकजमध्ये देशविदेशातून दोन हजार तबलिगी जमातवाले सहभागी झाले होते. हा कार्यक्रम आटपल्यानंतर हे तबलिगी वेगवेगळ्या राज्यात शहरात गेले. त्यानंतर सरकारने या सर्व तबलिगींना शोधून क्वारंटाईन केले. मात्र हजाराच्या वर तबलिगींना कोरोनाची लागण झाली होती. देशात कोरोना पसरविण्याचा आरोप असतानाही रुग्णालयात भरती केलेल्या, क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या तबलिगींनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत वाईट वर्तणूक केली होती

आपली प्रतिक्रिया द्या