अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूडला बदनाम करणाNयांना मंगळवारी खडे बोल सुनावले. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत. सोशल मीडियावर जया बच्चन यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा खबरदारी म्हणून संरक्षण दिले आहे. जुहूमधील बच्चन कुटुंबीयांच्या जलसा बंगल्याबाहेर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.

बॉलीवूडमधील ड्रग्जचा वाद मंगळवारी संसदेत पोहोचला. या विषयावर चर्चा करताना बच्चन यांनी भाजपचे खासदार रवि किशन यांचे नाव न घेता म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणारे इंडस्ट्रीलाच गटार म्हणत आहेत. हे निंदनीय आहे. ज्या ताटात खातात, त्याच ताटात छेद करतात. बच्चन यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटत आहे.