अमरावतीत कार अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण जखमी

accident

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे जाणार्‍या कारला अपघात झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर चार जण जखमी झाले आहे. ही घटना परतवाडा भोपाळ मार्गावरील बहिरम कारंजा येथे मंगळवारी सकाळी घडली.

परतवाडा येथील पेंशनपुरा येथील रहिवासी शेखर गहलोद कुटुंबातील चार सदस्य भोपाळकडे जात होते. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. यात कमलाबाई रामसिंह शेंगर नामक 62 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अशोक वाकोडे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच अचलपूर नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत असणारे विक्रम शेंगर यांच्या चेहर्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली.

या दोघांनाही अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक अशोक वाकोडे गाडी चालू असतांनाच त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले व हा गंभीर अपघात घडला.

आपली प्रतिक्रिया द्या