अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 पार, शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदी

400

अमरावतीत कोरोनाचा आकडा वाढत असून आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 700 च्या पार झाली आहे. हा आकडा सध्या 711 पर्यंत पोहोचला असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी अमरावतीत पुन्हा कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काल रात्री काढलेल्या आदेशानुसार शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजल्या पासून कडक संचारबंदी लावण्यात येणार असून सोमवारी सकाळपर्यंत ती कायम राहणार आहे.

गेल्या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दररोज 10 ते 25 रूग्ण वाढतच आहे. रुग्ण वाढत असताना नागरिक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकच जुमानत नसल्याचे दिसून आले. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे नागरिकांनी शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या आठवड्यात अचानक वाढला. नागपूर, अकोलानंतर अमरावतीचा कोरानोग्रस्तांचा आकडा 1 हजारच्या वर जाणार असल्याचे चित्र दिसू लागले. त्यामुळेच अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी कालच सर्वच व्यवहारांवर बंदी करण्यात आली.

2,500 रुपये द्या व कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवा, खासगी रुग्णालयाचा जीवघेणा खेळ

दरम्यान, सोमवारी पाच रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे एक दिवस आकडा कमी आढळून आला. मात्र आज पुन्हा दुपारपर्यंत 11 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहे. तपोवन येथील माधवी विहार येथील 33 वर्षीय महिला, भीमनगर येथील 40 वर्षीय महिला, बिच्छु टेकडी येथील 31 वर्षीय पुरूष, भिलटेक येथील 36 वर्षीय पुरूष, दत्त कॉलनी बडनेरा येथील 28 वर्षीय महिला, चांगापूर येथील 40 वर्षीय पुरूष, बडनेरा येथील 32 वर्षीय पुरूष, गौस नगर येथील 32 वर्षीय महिला, गजानन नगर येथील 39 वर्षीय पुरूष, गौस नगर येथील 32 वर्षीय व 60 वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या