अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे शताब्दी महोत्सव, पंतप्रधान मोदी करणार संबोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. तब्बल 50  वर्षानंतर पुन्हा एक पंतप्रधान विद्यापीठाच्या कार्यक्रमाला संबोधन करणर आहे. 1964 साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत संमारंभाला संबोधित केले होते.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी या निमित्ताने एक विशेष पोस्टाचे तिकीटही जाहीर करणार आहेत.

1877 साली सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएन्टल शाळेची स्थपाना केली होती. 1920 साली या संस्थेचे रुपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झाले होते. उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात 467.6 हेक्टरवर या विद्यापीठाचा कॅम्पस आहे. तसेच केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये या विद्यापीठाचे केंद्र आहेत.