ठाण्यामध्ये महाकाय लोखंडी छत मैदानावर कोसळले, सहा विद्यार्थी गंभीर जखमी

गेल्या काही दिवसांमध्ये होर्डिंग पडल्यामुळे अनेक गंभीर दुर्घटना शहरी भागांमध्ये घडल्या आहेत. अशीच घटना आता ठाण्यामध्ये घडली असून इमारतीवरील महाकाय लोखंडी छत फुटबॉल खेळत असणाऱ्या मुलांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

ठाण्याच्या उपवन येथील फुटबॉल टर्फ क्लबच्या मैदानावर ही भयंकर घटना घडली आहे. या मैदानावर नववी आणि दहावीची मुले पावसात फुटबॉल खेळत होती. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे क्लबच्या शेजारी असणाऱ्या इमारतीवरील महाकाय लोखंडी छत थेट मैदानावर खेळत असलेल्या मुलांच्या अंगावर पडले. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बेथनी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.