
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्र सरकारने नुकतील पॉर्न व्हिडीओ असणाऱ्या 827 वेबसाईटवर कारवाई करत बंदी घातली आहे. त्यानंतर या ‘अॅडल्ट कंटेंट’ वर बंदी घालावी किंवा नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन आणि मोफत इंटरनेट सेवा यामुळे मिळेल तिथे लोक पॉर्न पाहत आहेत. हिंदुस्थानींना पॉर्नचं व्यसनच जडले आहे, असे पोर्नहब वेबसाईटने आपल्या अहवालात म्हटले होतं. पण खरंच नक्की तसं आहे का? पाहूया…
> अमेरिका व ब्रिटन नंतर पॉर्न पाहाण्यात हिंदुस्थानचा तिसरा क्रमांक लागतो. त्यातही चाईल्ड पॉर्नसाईट शोधण्यात व शेअर करण्यात हिंदुस्थानी आघाडीवर आहेत
> हिंदुस्थानमध्ये पॉर्न पाहाण्याची किमान वेळ 8.22 मिनिटं आहे
> रोज पॉर्नसाईटवर जाण्याची वेळ 7.32 मिनिटं आहे
> 2016-17 मध्ये पॉर्न कंटेंटच्या विक्रित दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले
> हिंदुस्थानात प्रत्येक दिवशी डाऊनलोड केल्या जाणाऱ्या एकूण कंटेंट पैकी 35 ते 40 टक्के कंटेंट पॉर्न संदर्भातील असतो
> हिंदुस्थानात 18 ते 34 या वयोगटातील लोकं सर्वाधिक पॉर्न पाहतात
> जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांपैकी 48 टक्के लोकं ही हिंदुस्थानमधील असल्याचेही उघड झाले
> पॉर्न पाहणाऱ्या जगभरातील टॉप 10 शहरांमध्ये 6 शहरे हिंदुस्थानातील आहेत. यात नवी दिल्ली, पुणे, मुंबई, हावडा, उन्नाव आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे.
> सध्या जगभरात पॉर्न पाहणाऱ्या महिलांची संख्या 24 टक्के, तर पुरुषांची 76 टक्के आहे
> पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला सर्वाधिक काळ पॉर्न पाहतात. पुरुष साधारण 9 मिनिट 22 सेकंद पॉर्न पाहतात तर महिला 10 मिनिट आणि 12 सेकंद पॉर्न पाहतात


























































