क्रीडानगरीतून आनंद भारतीची हॅटट्रिक

यजमान श्री आनंद भारती समाजाने आपले वर्चस्व अबाधित राखत चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने आयोजित ठाणे जिल्हा निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेत सांघिक विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. श्री आनंद भारती समाज संघाने तीन सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकली. स्पर्धेतील 18 वर्षांखालील मुलांच्या गटात तिन्हीही पदके जिंकत एकहाती विजय मिळवला. स्पर्धेत 54 गुण नोंदवून श्री आनंद भारती समाजाने सलग तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर आपली मोहोर उमटविली. श्री माँ गुरुकुल संघाने 51 गुण मिळवत सांघिक उपविजेतेपद मिळवले. तर 19 गुणांसह अतुल्य संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल ः

मुले – 12 वर्षांखालील ः श्रीराम जाधव (श्री आनंद भारती समाज, सुवर्ण), निर्विघ्न कोकणे (रौप्य, श्री माँ गुरुकुल), गौरांश शिंदे (कांस्य, एनएचजीएसए),
14 वर्षांखालील ः स्वानंद मोरे (रौप्य, एनएचजीएसए), हरिधन शिंदे (रौप्य, श्री माँ गुरुकुल), राजवीर साठे (कांस्य, श्री आनंद भारती समाज),
18 वर्षांखालील ः स्वराज ठाकरे (सुवर्ण), रुद्र टिकेकर (रौप्य), हेमंत सुतार (कांस्य, सर्व श्री आनंद भारती समाज),
18 वर्षांवरील मुले ः आर्यन कदम (सुवर्ण, श्री माँ गुरुकुल), प्रतिश तरे (श्री आनंद भारती समाज), रमेश वझे (कांस्य, अतुल्य संघ).

मुली – 12 वर्षांखालील ः धृती कोतीन (सुवर्ण, श्री माँ गुरुकुल), दिशा पुंजरी (रौप्य, अतुल्य संघ), जुई कणसे (कांस्य, श्री अंबिका मल्लखांब),
14 वर्षांखालील ः शौर्या साळवे (सुवर्ण, श्री आनंद भारती समाज), प्राची सावंत ( रौप्य, श्री माँ गुरुकुल), विदुल पाटील (कांस्य, श्री आनंद भारती समाज),
16 वर्षांखालील ः अनुष्का चित्रे (सुवर्ण, गजानन विद्यालय), अस्मी खरात (रौप्य, श्री माँ गुरुकुल), काव्या नाईक (कांस्य, एनएचजीएसए).
16 वर्षांवरील ः जीविका मौर्य (सुवर्ण), कृष्णेषा चव्हाण (कांस्य) सर्व श्री माँ गुरुकुल.