
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सुप्रसिद्ध अंबाजी मंदिराला 27.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही देणगी त्यांनी खास एका उद्देशाने दिली आहे. देणगीतून मिळालेल्या पैशांतून मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना मोफत अन्नदान केले जाणार आहे. अनंत अंबानी यांनी जय अंबे तिथि योजनेला सपोर्ट करण्यासाठी या मंदिराला ही देणगी दिली आहे. मंदिरात येणारा कोणताही भक्त उपाशी राहू नये, यासाठी भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला अनेकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून 30 कोटींहून अधिक दान लोकांनी दिले आहे. या योजनेला पाठिंबा देण्यासाठी अनंत अंबानी पुढे आले असून त्यांनी पुढील पाच वर्षांत जेवणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.


























































