मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचे मुख्य न्यायमुर्ती शरद बोबडेंना पत्र, न्यायमुर्ती रामण्णांवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे.  रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमुर्ती एन व्ही. रामण्णा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामण्णा आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मिळून आंध्रचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

Andhra CM Jagan Mohan Reddy letter to Chief Justice of India S.A. Bobde

Y.S.JAGAN MOHAN REDDY AMARAVATI CHIEF MINISTER ANDHRA PRADESH 06.10.2020 Respected Sir, At the outset I must state that T am fully conscious of the content and the implication of the osth I have taken that I’l bear true faith and allegiance tothe Constitution of India a by aw established.


रामण्णा यांच्या मुलींचा जमीनीच्या खरेदी विक्रीत हात असल्याचेही रेड्डी यांनी म्हटले आहे.  न्यायमुर्ती रामण्णा यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुनावणी प्रभावित केल्याचे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. 6 ऑक्टोबर रोजी रेड्डी यांनी हे पत्र लिहिले आहे. रेड्डी चे मुख्य सल्लागार अयेज कल्लम यांनी हे माध्यमांमध्ये हे पत्र जारी केले आहे.  न्यायमुर्ती रामण्णा यांचे विरोधी पक्षाशी घनिष्ठ संबंध असून तेलुगु देशम पक्षाच्या भ्रष्टाचारासंबंधित प्रकरणे प्रभावित करत आहेत असे रेड्डी म्हणाले आहेत.

रामण्णा यांच्यामुळे विरोधी पक्षांचे खटले ठराविक जजेसकडे गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर रामण्णा हे चंद्रबाबू नायडू यांच्या इशार्‍यावर राज्य सरकार अस्थिर करण्याचा घाट घालत असल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला आहे.