आज अंगारकी…श्रीसिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात उद्या, मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून मंगळवारी रात्री 11.50 वाजेपर्यंत भाविकांना बाप्पाचे दर्शन करता येईल.

पहाटे बाप्पाची आरती, दुपारी नैवेद्य, सायंकाळी धुपारती, रात्री श्रीचे नैवेद्य व आरती होईल, अशी माहिती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महिला, पुरुष, गरोदर स्त्रिया, दिव्यांग यांच्यासाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.