
सामना ऑनलाईन । मुंबई
अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो ‘पॅडेड की पुशअप’मध्ये एका अंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अंतर्वस्त्र किकण्याचं आपलं काम त्याला सुरूच ठेवावे लागणार आहे. आपण हे काम करतोय हे आपल्या बायकोपासून लपवून ठेवायचं आहे. हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीची निर्मिती असलेल्या पॅडेड की पुशअपचे दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केले आहे.


























































