
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसऱयांना समन्स बजावूनही आज ते ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. देशमुखांच्या वतीने त्यांचे वकील इंदरपाल सिंग हे ईडी कार्यालयात पोहोचले होते. देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यालाही समन्स बजावण्यात आले असून त्याला 6 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडीने अनिल देशमुख यांना तिसऱयांदा समन्स बजावून आज सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. परंतु देशमुख प्रत्यक्ष पोहोचलेच नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे वकील सिंग यांनी हजेरी लावली. ईडीने अनिल देशमुख यांना यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते. वय आणि आजारपणाचे कारण देत देशमुख यांनी आपण ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही, व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्यात यावी असे ईडीला कळवले होते.
























































