जिवाभावाची जोडीदार – अनिल गवस

341

> आपला जोडीदार श्रद्धा अनिल गवस.

> लग्नाचा वाढदिवस 28 जानेवारी 1988.

> आठवणीतला क्षण माझ्या मुलाचा जन्म.

> त्यांचे दोन शब्दांत कौतुक गृहकृत्यदक्ष आणि अत्यंत प्रेमळ.

> त्यांचा आवडता पदार्थ मांसाहार फार आवडते, पण करली मासा तिला भरपूर आवडतो.

> एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ उकडीचे मोदक, पातोळ्या.

> वैतागतात तेव्हा वैतागणे मूर्खपणाचे आहे हे सिद्ध करून दाखवतो.

> त्यांच्यातली कला ती कामात चोख आहे, घरातले सगळे व्यवहार ती बघते. त्यामुळे गृहिणी कला तिच्याकडे आहे.

> त्यांची गंमत करायची असल्यास गंमत सतत चालूच असते. कधीतरी तिला एखादी गोष्ट पटकन न सांगता फिरवून फिरवून सांगतो.

> त्यांच्यासाठी गाणे पल पल दिल के पास, तुम रहती हो.

> तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे.

> भूतकाळात जगायचे असल्यास लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस.

> तुमच्यातील सारखेपणा दोघंही प्रेमळ आहोत.

> तुम्हाला जोडणारा भावबंध तिचं सतत कामात असणं.

> कठीण प्रसंगात त्यांची साथ जिवाभावाची.

> विश्वास म्हणजे प्रामाणिकपणा.

> आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट तिच्यापासून अजून काही लपवलेले नाही. त्यामुळे सांगण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. पण मनात खंत आहे की तिला फिरायला नेणे कामाच्या व्यस्त वेळांमुळे करू शकलो नाही. पण तरीही तिने कधी त्याची तक्रार केली नाही. मला समजूनच घेतले. त्यासाठी मनापासून माफी मागतो. ती नोकरी करते पण कितीही उशीर झाला तरी तिने कधी आम्हाला उपाशी ठेवले नाही की कधी आम्हाला सोडून माहेरीसुद्धा गेली नाही. इतकं तिचं आमच्याशी घट्ट नातं आहे. या सगळ्यासाठी तुझे मनापासून आभार. तुझी अशीच साथ सदैव मिळू दे हीच देवाचरणी प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या