“वायू, तू आता मोठा भाऊ झाला आहेस आणि…”, दुसऱ्यांदा आजोबा झाल्यानंतर अनिल कपूर यांची पोस्ट चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोनम दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. यानंतर काही वेळातच सोनमचे वडील आणि अभिनेते अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सोनम पुन्हा आई झाल्यानंतर अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात की, आणि बघता बघता सहजपणे माझे हृदय प्रेमाने आणखीन भरून आले आहे. या जगात तुझं स्वागत आहे, माझ्या बाळा. तुझ्यावर आतापासूनच खूप प्रेम आहे. वायू, तू आता मोठा भाऊ झाला आहेस… आणि मला खात्री आहे की तू ही जबाबदारी उत्तम पार पाडशील. सोनम आणि आनंद… तुमचे खूप खूप आभार…’नाना’चं हृदय आनंदाने भरून आलंय. बाळा, या गोंधळलेल्या पण सुंदर जगामध्ये तुझे स्वागत आहे. प्रेमाने भरलेल्या आयुष्यासाठी तुझे स्वागत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)