अनिल शिंदे यांचे निधन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनिल शिंदे (56) यांचे आज अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार सुनील शिंदे आणि भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे यांचे ते भाऊ होते.

अनिल शिंदे हे स्टेट बँकेमध्ये सेवेत होते. सुस्वभावी आणि दिलखुलास व्यक्ती म्हणून ते सर्वांना परिचित होते. उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, गटनेते व आमदार अजय चौधरी, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार विलास पोतनीस, आजी-माजी पदाधिकारी व विविध पक्षांतील पदाधिकाऱयांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अनिल शिंदे यांचा दशक्रिया विधी  शनिवार, 3 जूनला सकाळी शिवाजी पार्क येथे तसेच बारावे आणि तेरावे कार्य सोमवार, 5 जूनला त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी करण्यात येणार आहे.