Breaking- पुण्यात पुन्हा भिंत कोसळून दुर्घटना, 6 मजुरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून तीनजण जखमी झाले आहेत. तब्बल 15 जणांचा बळी घेणारी कोंढव्याची दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव येथे घडली आहे.

https://www.instagram.com/p/BzZJleEJRnL/?igshid=jiut0k6ky9al

आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले. आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या 5 मजुरांची नावे हाती आली असून ती खालीलप्रमाणे आहेत.

  • राधेलाल पटेल, (वय-25 वर्ष)
  • ममता राधेलाल पटेल (वय-22 वर्ष)
  • जेटूलाल पटेल (वय-55 वर्ष)
  • जेटू चंदन रवते

बचाव कार्यासाठी बोलावण्यात आलेल्या NDRF ने बचावकार्य थांबवले असून ढिगाऱ्याालून 3 जणांना जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आहे.