
कर्नाटकात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा लागू केला जाणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी या कायद्याबाबत संकेत दिले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा लागू करण्याच्या तयारी सरकारने केली आहे. बेळगावमध्ये 13 डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होत आहे. काँग्रेसने यासंबंधित विधेयकाला तीव्र विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. अल्पसंख्याकांना निशाणा बनवण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही विधेयकाला विरोध करणार आहोत, असे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.



























































