कोरोनाला रोखणारे ‘अँटीसेरा’ येतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातून मिळणारे प्लास्मा आता अत्यवस्थ कोरोनग्रस्तांत इम्युनिटी वाढवण्यासाठी वापरले जात आहे. पण अनेकदा एकाच्या रक्तातून मिळवलेले प्लास्मा सर्वांनाच लागू पडत नाही.शिवाय बऱयाचदा असे प्लास्मा उपलब्ध करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून आता हिंदुस्थानी आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर ) बायोलॉजिकल इ या कंपनीच्या सहकार्याने सर्वच कोरोना रुग्णांत प्रभावी इम्युनिटी तयार करू शकणारे ‘अँटीसेरा’ हे औषध शोधून काढले आहे. या औषधाची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास जगात पसणाऱया कोरोना महामारीवर अंकुश ठेवणे सुकर होणार आहे.

अँटीसेरा म्हणजे रक्तातील प्रोटीनपासून तयार होणारे प्रतिजैविक.असे प्रतिजैविक एखाद्या आजाराच्या विषाणूला रोखणारी इम्युनिटी शरीरात तयार करतो आणि त्यामुळे रुग्ण अशा किषाणूंच्या हल्ल्यातून बचाकतो.आयसीएमआर आणि हैदराबादच्या बायोलॉजिकल इ कंपनीच्या संशोधकांनी 10 सशक्त घोडय़ांना मृत विषाणू असलेले इंजेक्शन टोचले.त्यानंतर या घोडय़ांच्या शरीरात या विषाणूंना प्रतिबंध करू शकेल असे प्रतिजैकिक ’अँटीसेरा’ तयार झाल्याचे स्पष्ट झाले. हे अँटीसेरा कोरोनाच्या कोविड-19 विषाणूंना रोखण्यात यशस्वी ठरू शकतात. शिवाय प्लास्मा थेअरीपेक्षा हे प्रतिजैकिक कोरोनाग्रस्ताला देणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकते ,असे मत आयसीएमआरच्या एपिडेमियॉलॉजी आणि कम्युनिकेबल डीसीसेज विभागाचे प्रमुख डॉ समीरन पांडा यांनी व्यक्त केले आहे. मात्र यासंदर्भात ठाम निष्कर्ष अँटीसेराच्या मानकी चाचण्या यशस्वी झाल्यावरच काढता येणार आहे.

…तर ती कोरोनाच्या नाशासाठीची संजीवनीच ठरेल
आयसीएमआरचे नामकंत संशोधक डॉ पांडा यांच्या मते ,मृत कोविड विषाणूंचे इंजेकशन घोडय़ांमध्ये अँटीसेरा हे या विषाणूंना रोखणारे प्रतिजैविक (अँटीजेन ) तयार करीत असेल तर तेच कोरोनाला रोखण्यात प्रभावी ठरू शकते. अर्थात त्यासाठी या अँटीसेराच्या मानवी चाचण्या यशस्वी व्हायला हव्यात.तसे घडले तर घोडय़ांच्या रक्तातून मिळवलेले अँटीसेरा कोरोनाच्या नाशासाठी मिळालेली संजीवनीच ठरेल , असा आशावाद डॉ समीरन पांडा यांनी व्यक्त केला.