#MeToo : माझ्यावरील सर्व आरोप खोटे – अनू मलिक

मीटू अभियानांतर्गत अनेक महिलांनी सेलिब्रिटीजवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. यात संगीतकार अनु मलिक यांचाही समावेश होता. त्यामुळे मलिक यांची ‘इंडियन आयडल’ सिझन10 मधून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आता या शो मध्ये त्यांनी कमबॅक केले आहे. याच पार्श्वभूमीवर गायिका सोना मोहपात्रा व गायिका नेहा भसिन व श्वेता पंडित यांनी अनु मलिक यांच्यावर पुन्हा सोशल मीडियावरून टीका केली होती. आतापर्यंत मलिक यांनी याबाबत मौन साधले होते. मात्र आता त्यांनी मौन सोडले असून ट्विटरवर आपली परखड बाजू मांडली आहे.

2018 मध्ये सोना मोहपात्रा,नेहा भसिन,श्वेता पंडित ह्या गायिकांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केले होते. अनु मलिक यांनी या आरोपांवर बोलताना सांगितले की “एक वर्ष झाले माझ्यावर काही असे आरोप करण्यात आले आहेत की जे मी केलेलेच नाहीत.  मी स्वतःच सत्य बाहेर येण्याची वाट पाहत शांत बसलो होतो. पण आता माझ्या लक्षात आले की, माझे गप्प राहणे माझी दुर्बलता समजली जात आहे. माझ्यावर लावल्या गेलेल्या खोट्या आरोपांचा केवळ माझ्या प्रतिमेवर परिणाम झाला नाही तर मला व माझ्या कुटुंबाला त्याचा मानसिक त्रासही झाला आहे. तसेच माझ्या कारकिर्दीला या आरोपाचा कलंक लागला आहे. त्यामुळे मला गुदमरल्यासारखे वाटते आहे. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे की माझ्या आयुष्यातील या वयात, या टप्प्यावर अत्यंत अपमानकारक शब्द आणि भयानक घटनांना माझे नाव दिले जात आहे”, या शब्दात अनु मलिक यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या