बिग बॉस फेक? अमृता फडणवीसांसोबत दिसले अनूप जलोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस सिझन 12 सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. मात्र, सध्या नेटकऱ्यांनी या शोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण, सध्या बिग बॉसमध्ये दिसणारे अनूप जलोटा अमृता फडणवीसांसह एका जाहीर कार्यक्रमात दिसले आहेत. त्यांच्यासोबतचे फोटो खुद्द अमृता यांनीच आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.

25 ऑक्टोबर रोजी अमृता यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही फोटो शेअर झाले आहेत. रहमतें नामक एका सेवाभावी कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे हे फोटो असून त्यात अमृता फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गायक शान, सलीम-सुलेमान ही संगीतकार जोडी आणि अन्य मान्यवर उपस्थित असलेले दिसत आहेत. रहमतें या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतप्रेमींतर्फे गरीबांना आर्थिक आणि वैद्यकीय साहाय्य दिलं जात असल्याची कॅप्शनही या फोटोखाली आहे. पण, या फोटोत अनूप जलोटाही दिसत असल्यामुळे बिग बॉस हा कार्यक्रम फेक असावा, अशी शंका नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे.

एकतर हा कार्यक्रम जुना आहे किंवा मग बिग बॉस फेक कार्यक्रम आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. जर अनूप जलोटा यावेळी बिग बॉसच्या घरात असतील आणि हा कार्यक्रम स्क्रिप्टेड नसेल, तर ते एका जाहीर कार्यक्रमाला कसे दिसू शकतात, असा प्रश्नही एका नेटकऱ्याने विचारला आहे.

summary- anup jalota seen in public program