संघाच्या फोटोत अनुष्का पहिल्या रांगेत, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडविरोधी कसोटी सामन्यांसाठी हिंदुस्थानचा संघ सध्या लंडनला गेला आहे. मंगळवारी हिंदुस्थानच्या संघाने लंडनमधील हिंदुस्थानच्या दूतावासाला भेट दिली. या भेटीच्या वेळी खेळाडूंचा व दूतावासातील अधिकाऱ्यांचा एकत्र फोटो काढण्यात आला असून तो फोटो बीसीसीआायने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोवरून नेटकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बीसीसीआय सोबत कर्णधार विराट कोहलीची बायको अनुष्का शर्माला देखील ट्रोल केले आहे.

या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ही विराट कोहलीसोबत फोटोच्या मध्यभागी पहिल्या रांगेत दिसत आहे तर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा चौथ्या रांगेत उभा दिसतोय. अनुष्काला मिळालेल्या या खास वागणूकीचा तर अजिंक्य सोबत झालेल्या या अन्यायाचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेत बीसीसीआय आणि अनुष्काला ट्रोल केले आहे. विराट कोहली हा लंडनमध्ये हनीमूनला आला आहे का, असा देखील सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.