
चलनी नोटा या सगळ्या सारख्याच असतात. डोळस असलेल्यांना त्यावरील किंमत दिसते. पण दृष्टिहीनांनी काय करायचे…? ही उणीव भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी एक नवे मोबाईल ऍप लाँच केले. खास दृष्टिहिनांसाठी हे ऍप विकसित करण्यात आले असून याद्वारे दृष्टिहीन बांधव चलनी नोटा ओळखू शकतील. ‘मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर’ असे या ऍपचे नाव असून ते प्ले स्टोअर किंवा आयओएस ऍप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. नव्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा या नोटाबंदीनंतर आल्या. नव्या सीरीजमध्ये 10, 20 50, 100, 200, 500 आणि 500 रुपयांच्या नोटा गेली दोन वर्षे चलनात आहेत.





























































