अभय मोकाशी यांच्यावरील उपचारासाठी मदतीचे आवाहन

ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांना सध्या पोटाचा कर्करोग आणि नॉन-अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसचे निदान झाले आहे. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. शस्त्रक्रिया व इतर उपचाराचा खर्च 20 लाखांच्या घरात आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी अभय मोकाशी यांच्या मुलीने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मोकाशी यांच्यावर बोरिवली येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने साप्ताहिक केमोथेरपी, केमोपोर्ट इन्सर्शन आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मोकाशी यांच्या प्राध्यापिका कन्या डॉ. लावण्या यांनी केले आहे. दानशूर लोक https://www.impactguru.com/fundraiser/help-for-abhay-mokashi या डोनेशन लिंकवर किंवा supportabhay11@yeWank या यूपीआय आयडीवर पैसे पाठवू शकतात, असे मोकाशी यांच्या कुटुंबीयांतर्फे कळवण्यात आले आहे.