
अॅपलने बुधवारी आपल्या नव्या आयओएस 26 अपडेटला रोलआऊट केले आहे. हे अपडेट आयफोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर युजर्सला एआय आधारित पॉवर सेव्हिंग फीचर दिसेल. या फीचरचे नाव एडाप्टिव पॉवर आहे. या फीचरमुळे आयफोनची बॅटरी वाचण्यास मदत मिळेल. व्हिडीओ रेकार्ंडग, फोटो एडिटिंग किंवा गेमिंगवेळी बॅटरी वाचवण्याचे काम हे फीचर करणार आहे. हे फीचर सर्व आयफोन्सवर उपलब्ध होणार नाही. केवळ आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स, आयफोन एअर, आयफोन सीरिजमधील सर्व फोन आणि आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स या फोनमध्ये हे फीचर काम करेल. याआधी बॅटरी वाचवण्यासाठी युजर्स ब्राइटनेस कमी करणे, अलवेज ऑन डिस्प्ले बंद करणे किंवा लो पॉवर मोडचा वापर करत होते, परंतु एडाप्टिव पॉवर फीचर स्मार्ट आहे.