
अॅपल कंपनी येत्या 12 सप्टेंबरला त्यांचा मोस्ट अवेटेड आयफोन -15 लाँच करणार आहे. यावेळी आयफोनसोबतच अॅपल वॉच सिरीज 9, वॉच अल्ट्रा 2 आणि एअरपॉड्स pro सेकंड जनरेशन देखील लाँच करण्यात येणार आहे.
अॅपलकडून 12 सप्टेंबरला आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स असे चार मॉडेल लाँच करण्यात येणार आहेत.
चार्जिंग –
आयफोन 15 मध्ये युएसबी व सी पोर्ट चार्जिंग देण्यात येणार आहे. आयफोन प्रो मॉडेल्सला सी पोर्ट देण्यात येणार आहे तर वॅनिला मॉडेल्सला युएसबी 2.0 स्टँडर्ड पोर्ट देण्यात येणार आहे. तसेच याला 35W चे चार्जिंग सपोर्टही देण्यात आले आहे.
क्लासिक लूक –
आयफोन 15 प्रो ला क्लासिक लूक देण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या जागी खास टिटॅनियम बॉडी देण्यात आली आहे.
कॅमेरा अपग्रेट –
आयफोन 15 च्या सर्व मॉडेलमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासाठी पेरिस्कोप लेन्स वापरण्यात आली आहे.
नवीन रंग –
आयफोन 15 मध्ये टायटन ग्रे, ब्ल्यू, सिल्व्हर, स्पेस ब्लॅक हे चार रंग यात असणार आहेत.
किंमत –
आयफोन 15 ची सुरुवातीची किंमत ही 90 हजारापासून सुरू होणार आहे.
























































