नव्या वर्षात अॅपलला मिळणार नवा सीईओ

अॅपल कंपनीने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)चा शोध सुरू केला आहे. नव्या वर्षात अॅपलला नवीन सीईओ मिळावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. अॅपलचे सध्याचे सीईओ टिम कुक हे गेल्या 14 वर्षांपासून कंपनीचे नेतृत्व करत आहेत.

कंपनीने अद्याप यासंबंधी अधिपृतपणे कोणतीही माहिती शेअर केली नाही. कंपनीचा नवीन सीईओ हे कंपनीतील वरिष्ठ उपाध्यक्ष (हार्डवेअर इंजिनीअरिंग) जॉन टर्नस हे असू शकतात, असेही बोलले जात आहे. टर्नस हे अॅपलच्या प्रमुख हार्डवेअर प्रोडक्ट्सवर काम करत असून कंपनीत त्यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे कंपनी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करू शकते. 2011 साली स्टिव्ह जॉब्स यांनी पद सोडल्यानंतर टिम कुक यांनी कंपनीची धुरा सांभाळली होती.