आपल्याला अनेकदा डाॅक्टर सांगतात की, साखर अति खाऊ नका. परंतु हीच साखर खाण्याऐवजी, तुमच्या त्वचेवर लावली तर ती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. महागड्या स्किन केअर उत्पादनांच्या काळात, साखर त्वचेसाठी खूप महत्त्वाची आहे हे अनेकांना माहीतही नाही. त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर, त्वचेवर साखर वापरणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
साखर तुमच्या पोटासाठी चांगली नसली तरी ती, त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पण त्वचेसाठी त्याचे फायदे मिळवण्यासाठी ते खाण्याऐवजी त्वचेवर लावावे. खरंतर, साखर त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. म्हणूनच मृत त्वचा काढण्यासाठी साखरेचा वापर करायला हवा.
Skin Care- फक्त 1 चमचा तांदळाने तुमचा चेहरा होईल कोरियन महिलांसारखा सुंदर, वाचा सविस्तर
त्वचेसाठी साखरेचे फायदे
साखरेचा वापर चेहऱ्यासाठी स्क्रब म्हणून केला जातो. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि त्वचा तरुण दिसते. साखरेचा नियमित आणि योग्य वापर केल्याने सुरकुत्या यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
साखरेचा स्क्रब वापरणे खूप सोपे आहे, सर्वप्रथम एक चमचा साखर घ्या आणि ती ग्राइंडरमध्ये टाका आणि हलके बारीक करा. पावडर जास्त बारीक करू नका. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा गुलाबजल घाला. यानंतर, तुमच्या बोटांनी हलक्या दाबाने 15 मिनिटे घासून स्वच्छ पाण्याने धुवा.
तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मुरुमे किंवा इतर कोणतीही समस्या येत असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्या त्वचेवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांनी दिलेले कोणतेही उत्पादन वापरत असाल, तर त्याबद्दल एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.