
लडाखमध्ये हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. हा तणाव संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यांत चर्चा सुरू आहे. त्यामुळे सैन्य प्रमुख मनोज नरवणे लडाखमध्ये जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सैन्यप्रमुख नरवणे या आठवड्यात लडाखमध्ये जाणार आहेत. लडाखमधील परिस्थिती, सैन्याची तयारीचा ते आढावा घेतील. तसेच उपस्थित अधिकार्यांशी चर्चा करतील. गेल्या एक महिन्यापासून लडाखमध्ये दोन्ही देशांत तणाव आहे. परंतु गेल्या एक आठवड्यापासून तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सैन्यप्रमुख सीमेवर गेल्यास जवानांमध्ये उत्साव वाढेल.
काही दिवसांपूवी हवाई दल प्रमुख भदोरिया यांनीही लेहचा दौरा केला होत. त्यांनी हवाई दलाच्या तयारीची आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
























































