मॅजिक बॉक्स- अन्नदाता सुखी भव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अशोक डुंबरे

दूरदर्शनसाठी शेतीविषयक कार्यक्रम करणं हा खरोखरच आनंददायी भाग होता. पाडेगावमधील ऊस संशोधन केंद्रातील काम, वाल्हे येथील हिरालाल शहा यांची विविध प्रयोगांची द्राक्षबाग, गगनगिरी महाराजांचा शेतकऱयांविषयीचा कळवळा, त्यांचे कोकणातील शेतीविषयीचे ज्ञान ते अगदी संकरित ज्वारीचे उत्तम पीक घेणारा वैदू समाजातील शेतकरी अशा अनेकांची प्रयोगशीलता दर्शवता आली. शेती करणाऱया शेतकऱयांची शेती लोकांना दाखवल्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला.

पुणे जिल्हा आल्यानंतर नीरा ओलांडल्यावर डाव्या हाताला पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रातील उत्तम उसाच्या जाती येथे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात होत्या आणि उसाचं बियाणं शेतकऱयांना पुरवलं जात होतं. तसंच उत्तम गुण कसा असावा याचं शेतकऱयांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवलं जात होतं. माझे मित्र डॉ. ज्ञानेश्वर हापसे हे ऊस विशेषतज्ञ म्हणून बरेच वर्षे इथे काम करत होते. त्यामुळे वर्षातून दोन-तीन वेळा कार्पामानिमित्त पाडेगावला जाणे होत असे.

एकदा पाडेगावला जाताना वाह्याच्या अलीकडे डाव्या हाताला माळरानावर द्राक्षबाग दिसली म्हणून मी चौकशी केली. तेथे गेलो तर वाल्हे येथील शेतकरी हिरालाल शहा यांची तेथे शेती होती. द्राक्षबागेबरोबर अन्नधान्याची पिकेसुद्धा ते तिथे घेत होते. पाण्याचे दुर्भिक्ष असूनही त्यांनी माळरानावर नंदनवन फुलवले होते. त्यांच्याकडे द्राक्षाच्या सीडलेस जाती तसेच बऱयाच प्रकारच्या द्राक्षाच्या जाती थोड्याफार प्रमाणात ते पाच एकरावर घेत असत. एकदा ठरवून त्यांच्याशी बोलून कार्पाम करण्याचं ठरवलं. द्राक्षाच्या एप्रिल-मे च्या सिझनमध्ये मी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर हिरालाल शेठ यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या लाडक्या मुलीची आठवण झाल्याचं कळलं. काही दिवसांपूर्वी तिचं निधन झालं होतं. ती आज हा कार्पाम पाहायला पाहिजे होती असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं.
ते व्यापारी होते. त्यांच्या एका भावाचे मेडिकलचे दुकान नीरा येथे होतं आणि ते स्वत शेतामध्ये राबत असत. द्राक्षबागेचा दांडगा अनुभव तसंच मार्केटिंगचं उत्तम ज्ञान त्यांना होतं. त्यामुळे त्यांच्या द्राक्षाला बाजारपेठेत जास्त भाव मिळत असे. 80-82 दरम्यान अरुण श्रॉफ मुंबई दूरदर्शनचे संचालक होते. त्यांनी मला एकदा विचारलं की, मला तुझ्याबरोबर यायला आवडेल. म्हणून मी हिरालाल शहा यांच्या शेतावर अरुण श्रॉफ यांना घेऊन गेलो होतो. ते त्यांच्या मिसेसला घेऊन आले होते. त्यांनी दोन तास बागेची पाहणी केली. बागेतच जेवण केलं. नंतर त्यांनी हिरालाल यांच्याशी चर्चा केली की, द्राक्षाची वाईन कशी करतात? तेव्हा त्यांनी नीट समजून सांगितलं की, वाईनसाठी वेगळ्या व्हरायटी लागतात. पुणे जिह्यातील नारायणगाव येथे फक्त वाईन बनवणारी द्राक्षं घेतली जात होती. मला वाटतं, चौगुले नावाच्या शेतकऱयाने हा प्रकल्प राबवला होता. आता त्याला बरीच वर्षे झाली, तो प्रकल्प चालू आहे की नाही, माहीत नाही. तसेच मला निवृत्त होऊन 27 वर्षे झाली. बऱयाच वर्षांत त्या भागात गेलो नाही. त्यामुळे काय चाललं आहे हे माहीत नाही, पण 80 ते 90 च्या दरम्यान कधी कार्पामाच्या निमित्ताने मित्रांना घेऊन द्राक्षं खायला नेहमीच जात असे. जाताना ते प्रत्येकाला दोन-दोन किलोच्या द्राक्षाच्या पेट्या भेट देत असत. आता बाजारातून द्राक्षे घ्यावी लागतात, पण शहा यांच्या बागेतील द्राक्षांची चव खूप गोड होती. त्या गोड आठवणी अजूनही आठवतात.

पुणे-मुंबई रस्त्यावर जुन्या रस्त्याने जाताना खोपोली येथे गगनगिरी महाराज यांचा आश्रम होता. गगनगिरी महाराज हे हठयोगी होते. त्यांनी बारा वर्षे पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली. त्यांचे पाय माशांनी खाल्ले असं म्हणत असत. त्यांच्या एका भक्ताने मला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात नेले होते. आध्यात्मिक ज्ञानाबरोबर शेतकऱयांविषयी त्यांना खूप कळवळा होता. तसंच कोकणातल्या शेतीविषयी माहिती होती. मी गगनगिरी महाराजांना विनंती केली की, आपण दूरदर्शनसाठी एखादी मुलाखत द्यावी, ज्यायोगे शेतकऱयांना मार्गदर्शन होईल आणि आपले दर्शन होईल. म्हणून मी खोपोलीला गेलो होतो. त्यांचा आश्रम अत्यंत स्वच्छ, निसर्गरम्य ठिकाणी होता. शेजारून बारा महिने वाहणारा पाण्याचा प्रवाह होता. त्यानंतर या आश्रमाचा विस्तार झाला, पण मला अजूनही तो जुना आश्रम आठवतो. त्यांचा एखादा शिष्य त्यांना पाठीवर घेऊन त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून आश्रमात घेऊन यायचा. मग महाराज झोपाळ्यावर विराजमान व्हायचे. लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे, लोकांना दर्शन द्यायचे. त्याच ठिकाणी मी त्यांची मुलाखत घेतली आणि तो कार्पाम दूरदर्शन केंद्रावरून दाखविण्यात आला. महाराष्ट्रात त्यांचे अनेक भक्तगण आहेत. त्यांना हा कार्पाम पाहता आला.

कोल्हापूर जिह्यातील गगनबावडा येथे खूप खोलवर दरीत महाराजांचा आश्रम आहे. तेथेही माझा जाण्याचा योग आला. अरुण श्रॉफ डायरेक्टर असताना कोल्हापूरला गेलो होतो. बेरी नावाचा आर्किटेक्ट त्यांच्या वाचनात आला होता. म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. त्यांनी गगनबावडा येथे एक सुंदर लाकडी गृहरचना केली होती. ती पाहण्यासाठी आम्ही दोघे गेलो होतो, पण नंतर मी एकटाच खाली जाऊन गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांना भेटलो, त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ‘मला माहीत होतं की, तुम्ही मला इथे भेटायला येणार आहात.’ आता या कार्पामाच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. त्या व्यक्ती आहेत की नाही, माहीत नाही.

माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांच्याशी चांगल्यापैकी ओळख होती. बारामती प्रतिष्ठान स्थापन केल्यानंतर त्यांच्या मडक्याच्या ठिबक सिंचनाचा कार्पाम मी केला होता. तसंच प्रतिष्ठानवरसुद्धा एक लघुपट केला होता. राज्यात महाराष्ट्र शासनात ते मंत्री होते. त्यांनी कृषिखात्यातील ‘शेतकरी’ मासिकाचे संपादक आबा पाटील यांना निरोप पाठवून मला विमानतळावर बोलून घेतले. वैदू समाजातील एक शेतकरी जो संकरित ज्वारीचे उत्तम पीक घेतो, तर त्याची मुलाखत घ्यावी असे आप्पासाहेब पवारांनी सांगितले आहे, असा मला निरोप मिळाला. मग मी हवेली तालुक्यातील एका शेतावर माझी टीम घेऊन त्या वैदू शेतकऱयाची मुलाखत घेतली. वैदिक समाज शेड्यूल ट्राइबमधील फिरती जमात आहे. ते एका ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारकडून शेती मिळाल्यावर ते एका जागी स्थिर झाले आणि शेती करू लागले. काही अनुभव नसताना संकरित ज्वारीचे पीक या वैदू शेतकऱयाने खूप चांगलं घेतलं. एक प्रकारे इतर शेतकऱयांना हा चांगला संदेश होता. हा कार्पाम प्रसारित झाल्यावर बऱयाच लोकांना तो आवडला आणि वैदू समाजसुद्धा शेती करतो हे त्यामुळे सिद्ध झालं. अशा शेती करणाऱया शेतकऱयांची शेती लोकांना दाखवल्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)