पराक्रमी शंकरजी नारायण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. 17 व्या शतकाच्या अखेरीस शंकाजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. त्यांनी शिकस्त लावली आणि सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. शंकरजी नारायण हे भोर संस्थानाचे मूळ संस्थापक होते. त्यांची समाधी पुणे जिह्यातील भोर तालुक्यामध्ये ‘आंबवडे’ या गावी आहे. समाधीच्या परिसरामध्ये प्राचीन नागेश्वर मंदिर असून, तेथे जाण्यासाठी एक प्रसिद्ध झुलता पूल बांधण्यात आला आहे. तसेच, मागच्या अंगणात काही कोरीव शिल्पे, वीरगळ आणि सतीचे दगड आहेत. पूर्वीच्या या समाधीचा जीर्णोद्धार भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंत सचिव यांनी इ.स. 1934 मध्ये करून तो संगमरवरात बांधला.