कलम 370- इमरान खानचा नवा डाव, मुझफ्फराबादमध्ये काढणार महारॅली

1129

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेला पाकिस्तान जगाचे लक्ष वेधण्यासठी नवीन नवीन क्लृप्त्या लढवत आहे. पण कोणीच त्याची दखल घेत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी मुझफ्फराबादमध्ये महारॅली घेणार असल्याचे टि्वटरवर जाहीर केले आहे.

खान यानी टि्वटमध्ये या रॅलीबद्दल माहिती दिली आहे. येत्या 13 सप्टेंबरला पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये मोठी रॅली होणार आहे. कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराने घेराव घातला आहे. याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आम्ही कश्मीरी नागरिकांबरोबर आहोत हे सांगणे हाच या रॅलीमागचा उद्देश्य असल्याचे खान यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने पाकडे तंतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच इमरान खान आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी कश्मीरला कधीही एकट पाडणार नाही. कश्मीरविना पाकिस्तान अपूर्ण आहे. तसेच कश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे असे म्हटले होते. तसेच आज आपण पुन्हा 1965 सारख्या परिस्थितीचा सामना करत आहोत. शत्रु पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर उभा ठाकला आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाविरोधात जाऊन कश्मीरचा विशेष दर्जा हटवण्यात आला आहे. कश्मीरी जनतेवर अत्याचार केले जात आहेत. अशी गरळ यांनी ओकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या