
सामना ऑनलाईन, पेण
कश्मीरमधील कलम 370 वरून डाव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. संसदेत या विधेयकाला डाव्या खासदारांनी सपशेल विरोध केला असतानाच शेतकरी कामगार पक्षाने मात्र या विधेयकाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेकापने सहकारी पक्षांना तोंडघशी पाडल्याने डाव्यांची चांगलीच गोची झाली आहे.
डाव्या पक्षांनी आझाद मैदानामध्ये निदर्शने केली. मात्र डाव्या पक्षांमधील शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कलम 370 ला पाठिंबा दिला. पाटील यांनी सांगितले की, देशहितासाठीच केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यास सर्वांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.

























































