शोध सत्याचा – धर्माच्या आडोशान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>चंद्रसेन टिळेकर

धर्मभावनेने एखाद्या समाजातील, देशातील माणसे एकदा पिसाटली गेली की, त्यांना जळी, स्थळी, काष्ठाr देवाप्रमाणे धर्म आणि धर्माचार दिसायला लागतो. खरं तर समाज विकासाच्या दृष्टीने हे मोठे घातक असते. कारण जगाचा इतिहास हे सांगतो की, जिथे जिथे भक्ती फोफावली होती तिथल्या धर्ममार्तंडांनी भक्ती पेरली तिथे तिथे समाज अंधारयुगात ढकलला गेला.

धर्मभावनेने एखाद्या समाजातील, देशातील माणसे एकदा पिसाटली गेली की, त्यांना जळी, स्थळी, काष्ठाr देवाप्रमाणे धर्म आणि धर्माचार दिसायला लागतो. खरं तर समाज विकासाच्या दृष्टीने हे मोठे घातक असते. कारण जगाचा इतिहास हे सांगतो की, जिथे जिथे भक्ती फोफावली होती तिथल्या धर्ममार्तंडांनी भक्ती पेरली तिथे तिथे समाज अंधारयुगात ढकलला गेला. सुदैवाने त्याविरोधात युरोपमध्ये रेनेसान्स म्हणजे प्रबोधन युग अवतरले आणि परिणामी केवळ युरोपच नव्हे तर सर्व विश्व नवविचाराने उजळून गेले. त्या वेळी युरोप खरं तर आपल्यापेक्षा मागासलेला होता. स्वा. सावरकरांनी यासंदर्भात आपल्या ‘क्ष-किरणे’ या पुस्तकात हे ऐतिहासिक सत्य केवळ चार ओळीत पुढीलप्रमाणे मांडले आहे. ते असे की, ‘युरोपने बायबल मिटले आणि त्यामुळे जो युरोप आमच्या मागे चारशे वर्षे होता, तो बघता बघता आमच्या पुढे चारशे वर्षे निघून गेला.’ या पार्श्वभूमीवर धर्म ही शक्यतो अडगळीत ठेवण्याचीच गोष्ट आहे हे मान्यच करावे लागते. कारण धर्मप्रेमातून धर्मविद्वेष केव्हा निर्माण होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडून ज्याला सिव्हिल वॉर म्हणतात तेही उद्भवू शकते. युरोपातील धार्मिक युद्धे (crusades) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यासाठीच धर्म हा राजकारणासह सर्व क्षेत्रांपासून सोवळा ठेवला पाहिजे, पण हे औचित्य आपल्या देशात कुणीच पाळताना दिसत नाही.

धर्मात राजकारण आणण्याचे पातक प्रथम भाजपने केले. या देशातील जनता धर्मभोळी आहे, तो धर्मभोळेपणा आपल्याला इंग्रजीत ज्याला (cash) करणे असे म्हणतात तसा कॅश करून या भोळय़ा-भाबडय़ा जनतेच्या टाळूवरील लोणी विनासायास खाता येईल हे या पक्षाने ओळखले आणि त्याप्रमाणे त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. त्यामुळेच सरकारी पातळीवर कोणतीही पूजाअर्चा असो वा धार्मिक उपचार होता कामा नये हे भान सुटले. अर्थात काँग्रेस सत्तेवर असताना तेही याबाबतीत धुतल्या तांदळासारखे नव्हते. याचे कारण त्या पक्षातही छुपे धर्मवादी होतेच. काखेत अस्तनीतले निखारे असावेत तसे आणि त्यातही दुर्दैव म्हणजे ही खूप मोठी माणसे होती. उदा. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित मदनमोहन मालवीय, श्यामाप्रसाद मुखर्जी इ. याउलट पं. नेहरू हे प्रखर निधर्मी अन् विज्ञानवादी होते.

पं. नेहरू हे सार्वजनिक जीवनात वावरताना संविधानाशी कसे प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीत याचा अनुभव जेव्हा सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला त्याप्रसंगी आला. याप्रसंगी उपस्थित राहावे म्हणून त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्या देवस्थानाने आमंत्रण पाठवले. हे जेव्हा पं. नेहरू यांना कळले, तेव्हा त्यांनी राजेंद्र प्रसाद यांनी त्या समारंभास जाऊ नये म्हणून त्यांना विनंती केली. आपल्या देशाने निधर्मी धोरण स्वीकारले आहे, तेव्हा एखाद्या धार्मिक समारंभात सरकारी पातळीवर सहभागी होणे गैर आहे असे त्यांनी परोपरीने सांगून पाहिले, पण डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काही ते ऐकले नाही आणि ते त्या समारंभास हजर राहिले. असे असले तरी खुद्द पं. नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांच्या उत्तरायुष्यात मात्र त्यांनी अनेक देवालयांना भेटी दिल्या. इतकंच काय पण त्या वेळी जे बाबा, बुवा गाजले होते, त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला होता. याचे महत्त्वाचे कारण असे सांगतात की, त्या काहीशा नैराशाने ग्रासल्यासारख्या झाल्या होत्या.

हे सर्व विवेचन या ठिकाणी करण्याचे कारण म्हणजे देव हा देव्हाऱयापुरता आणि धर्म हा उंबऱयापर्यंतच असावा याचे भान ठेवण्याचे आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. या दोन गोष्टी दुबळय़ा मंडळींच्या मनःशांतीसाठी आवश्यक असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नसल्याने त्यांच्या विरोधात प्रबोधन करताना अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे हे मात्र तितकेच खरे, परंतु दुर्दैवाने आपल्या देशात धर्माच्या नावाने जो गावोगावी जल्लोष चालतो तो काहीसा काळजात धडकी भरवणारा आहे. मुंबई-पुणे हायवेवरून जाताना रोज कुठल्या ना कुठल्या गावातून न ऐकलेल्या देवदेवतेची पालखी एका गावातून दुसऱया गावाकडे जाताना दिसते. प्रस्थापित तसेच कधीच न ऐकलेल्या बाबा, बुवांच्या प्रकट दिनांची तर वावटळ उठलेली दिसते.
आपला देश अजूनही उर्जितावस्थेला आलेला नाही. प्रचंड दारिद्रय़ामुळे मोठय़ा प्रमाणावर लोक या देशात अर्धपोटीच झोपतात. अशा परिस्थितीत एखाद्या शिलेवर, पिंडीवर घागरीच्या घागरी दूध ओतणे कितपत नैतिक आहे? पण हे सर्रास चालू आहे.

‘गुलामांना देव नसतो’ असे सार्थ वचन आहे. त्याच धर्तीवर म्हणावे लागते की, गरीब देशाला देव आणि धर्म या चैनीच्याच वस्तू असतात. एक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ तर परखडपणे म्हणतो की, ‘देव आणि धर्म या लबाड लोकांच्या लपायच्या जागा आहेत.’ विशेष म्हणजे या दोन्हीच्या आडून अगदी लीलया भाबडय़ा जनांचे शोषण केले जाते. म्हणूनच डॉ. लागू म्हणत की, ‘‘परमेश्वराला रिटायर करा!’’ हे कदाचित काही मंडळींना टोकाचे मत वाटेल, पण मग त्याचबरोबर हेही तितकेच खरे आहे की, अशा प्रकारचा धार्मिक भाबडेपणा हा केव्हा धार्मिक उन्मादाचा ज्वालामुखी निर्माण करील याची शाश्वती देता येत नाही!
लाखोंच्या संख्येने निर्माण झालेले बुवा-महाराज आपल्या कोटय़वधी भाबडय़ा भक्तांमध्ये केवळ दैववाद पेरताहेत. अशा समाजात विवेकवाद अन् विज्ञान बहरणार तरी कसे आणि आपली प्रगती होणार तरी कशी! मंत्राने पैशांचा पाऊस पडू शकतो यावर विश्वास ठेवून तसे करायला गेल्यावर कितीतरी जणांच्या हत्या बाबा लोकांनी केल्या आहेत.

या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण द्यायचे असेल तर ते पु.ल. देशपांडे यांच्या शब्दांतच द्यावे लागेल. तो शब्द म्हणजे आमच्या हाडीमांसी खिळलेला कमालीचा ‘बौद्धिक आळस!’ आणखी दुसऱया शब्दांत सांगायचं तर आपण हे विसरून गेलो आहोत की, ‘‘INDIA IS A FREE COUNTRY AND HENCE WE ARE ALLOWED TO USE OUR COMMON SENSE!’’
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)