
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
ब्रिटन ही युरोपातली एक तुल्यबळ अशी महासत्ता आहे आणि तेथील पंतप्रधानांचे ध्येयधोरणे संपूर्ण युरोपाच्या कार्यशैलीवर प्रभाव करत असतात. लीझ या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत; एक तर त्यांच्या धडाडीवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे, त्याचबरोबर अतिउत्साहामुळे त्यांच्यावर अविश्वासही आहे. या दोन्हींचा समन्वय साधत ट्रस या खंबीरपणे त्यांची भूमिका सांभाळतील असा विश्वास वाटतो.
गेल्या तीन महिन्यांपासून हिंदुस्थानी जनतेच्या ताणल्या गेलेल्या उत्सुकतेचा 5 सप्टेंबर रोजी शेवट झाला. यंदाची ब्रिटनची पंतप्रधान पदासाठी हुजूर पक्षाची निवडणूक चुरशीची होती, हिंदुस्थानी लोकांसाठी विशेष महत्त्वाची होती. हुजूर पक्षाचे ऋषी सुनक हे हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटिश राजकारणी पंतप्रधानपदासाठी उभे होते ऋषी सुनक हे हिंदुस्थानचे जावई. आपल्या आयटी टाईकून नारायण मूर्ती आणि ज्येष्ठ समाजसेविका सुधा मूर्ती यांचे ते जावई. त्यांच्या विरोधात उभ्या होत्या पक्षाच्या आक्रमक लीझ ट्रस. खरंतर सुरुवातीला हे पारडे ऋषी सुनक यांच्याकडे पूर्णपणे झुकलेले होते, हिंदुस्थानी लोकांच्या अशा पल्लवीत झालेल्या होत्या. ब्रिटिशांनी साडेतीनशे वर्षे हिंदुस्थानवर राज्य केले, हिंदुस्थानचे मूलतत्त्वज्ञान पार बुडवून टाकले. आज हिंदुस्थानचा वंशज ब्रिटिशांचा पंतप्रधान व्हायला निघाला होता. प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीला ही गोष्ट अभिमानास्पद वाटत होती. बहरहाल त्यांची लोकप्रियता पुढे कमी होत गेली. पंजर्वेटिव्ह पक्षांतर्गत त्यांना 50 टक्के तर ट्रस यांना 73 टक्के सदस्यांचा कल दिसून येत होता. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जवळपास 81,326 वोट ही ट्रस यांना मिळाली तर सुनक यांना 60399 मतांनी माघार घ्यावी लागली. काही का असेना ब्रिटन मधल्या सर्वात उच्चपदाच्या निवडणुकीमध्ये सुनक हे एक प्रतिस्पर्धी होते हेही नसे थोडके. ऋषी सुनक यांना पुढेही निवडणुकांमध्ये संधी आहे. त्यांची योग्यत्या ते भविष्यात सिद्ध करतीलच यात संशय नाही.
विमुक़्ताचा विषय मात्र कर्तुत्ववान प्रतिभावंत राजकारणी महिला असा आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटिश सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांनी ट्रस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले. महाराणी एलिझाबेथ यांच्या वाल्मोरल पॅसलमध्ये हा समारंभ पार पडला. परंपरेनुसार तो बंकिंगहम पॅलेसमध्ये व्हायला हवा, परंतु महाराणीच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे तो तिथे होऊ शकला नाही. पुढे दोनच दिवसांनी महाराणी यांचे देहांत झाले.
ट्रस ब्रिटनच्या तिसऱया महिला पंतप्रधान ठरल्या, पहिल्या पंतप्रधान आयर्न लेडी मार्गारेट थॅचर, त्यानंतर थेरेसा मे या महिला पंतप्रधानांनी त्यांचा कार्यकाळ गाजवला होता. ट्रस यांची राजकारणावरची पकड, आक्रमकता, पक्षांतर्गत प्रभाव, त्यांची रशिया-युव्रेनच्या संदर्भात असलेली भूमिका आणि निर्विवादपणे युव्रेनच्या पाठी ठामपणे उभ राहण्याचे धाडस यामुळे त्यांनी विजय खेचून आणला.
लीझ ट्रस यांचा जन्म (26 जुलै 1975) ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील गणिताचे प्राध्यापक होते तर आई शिक्षिका आणि नर्स होत्या. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र्ा आणि अर्थशास्त्र्ा शिक्षण घेतले. त्यांचा विवाह ह्यु ओ’लेरी यांच्यासोबत 2000 मध्ये झाला. त्यांना दोन मुली आहेत. ट्रस सुरुवातीला महाविद्यालयीन काळामध्ये डाव्या मजूर पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या, पण पुढे 1996 मध्ये त्यांनी सत्ताधारी हुजूर पक्षामध्ये प्रवेश केला. 2001 आणि 2005 च्या सुरुवातीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 पासून मात्र त्या हुजूर पक्षाच्या सर्वोच्च यादीमध्ये गणल्या गेल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील काही वादग्रस्त प्रसंगांमुळेही त्यांची राजकारणातली घोडदौड थोडी मंदावली होती, मात्र आक्रमक असलेल्या ट्रस यांना पराभव मान्य नाही.
डेव्हिड पॅमेरॉन, थेरेसा मे आणि बोरीस जॉन्सन या तिन्ही पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध मंत्रीपदे आणि सचिवपदे सांभाळली. 2012 मध्ये त्या शिक्षण खात्याच्या संसदीय सचिव होत्या, तर 2014 मध्ये त्या पर्यावरण खात्याच्या सचिव होत्या. थेरेसा मे यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महिला चॅन्सलर, ब्रिटिश खजिन्याच्या मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. बोरीस जॉन्सन यांच्या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव, विदेश सचिव म्हणूनही काम पाहिले.
युरोपियन युनियनच्या मते ट्रस यांचा ब्रिटनच्या युनियनमधून बाहेर पडण्याच्या भूमिकेला विरोध होता. तथापि, त्यांनी बोरीस जॉन्सनच्या मंत्रिमंडळ आणि निर्णयांना संपूर्ण सहकार्य केले होते. पंतप्रधान ट्रस यांच्यासमोर जीवनमानाच्या वाढलेल्या खर्चापासून ते देशाच्या तिजोरीवर वाढणारे वेगवेगळे बोजे, इंधन महागाई, कर असे अनेक दैनंदिन प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध, युरोपियन भूमिका, चीन, रशियाची वाढती दादागिरी अशा अनेक संकटांनी त्या घेरलेल्या आहेत. तरीही त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्या येत्या काही दिवसांतच ब्रिटिश नागरिकांच्या जगण्याचा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी वचनबद्ध आहेत. वापरत्या ऊर्जाचा खर्च आणि इंधनाचा खर्च कमी करण्यावर त्यांचा भर असेल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर 47 वर्षीय लीझ ट्रस यांनी मुबलक वाढलेली कर कपात करण्याचे आणि इंधनावरील विविध आर्थिक बोजे कमी करण्यासाठी प्रयत्नरत असणार आहेत असेही जाहीर केले. एपंदर त्यांच्या उत्साही स्वभावावरून आणि धडाडीच्या कार्यशैलीवरून त्या लवकरच त्यांनी दिलेली वचन पूर्ण करून ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय दायित्व निभावण्यासाठीही प्रयत्न करतील यात शंकाच नाही.
ट्रस यांच्या नियुक्तीमुळे युरोपातील डझनावारी महिला पंतप्रधान प्रमुख आणि चॅन्सलर यांच्या यादीमध्ये ट्रस यांचे नाव सर्वांच्या वरती जाऊन बसले असे म्हणायला पाहिजे. ब्रिटन ही युरोपातली एक तुल्यबळ अशी महासत्ता आहे आणि तेथील पंतप्रधानांचे ध्येयधोरणे संपूर्ण युरोपाच्या कार्यशैलीवर प्रभाव करत असतात, याची जाणीव अर्थातच ट्रस यांना आहे. हिंदुस्थानबरोबर त्यांची सहकार्याची भूमिका आहे. त्या हिंदुस्थान भेटीवर एकदा येऊन गेलेल्या आहेत. लीझ या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत; एक तर त्यांच्या धडाडीवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे, त्याचबरोबर अतिउत्साहामुळे त्यांच्यावर अविश्वासही आहे. या दोन्हींचा समन्वय साधत ट्रस या खंबीरपणे त्यांची भूमिका सांभाळतील असा विश्वास वाटतो. महाराणीच्या मृत्यूनंतर ब्रिटनवर आलेले दुःखद संकट, याशिवाय आंतरराष्ट्रीय, युरोपियन संबंध सांभाळण्याची जबाबदारी या सर्वांमधून ट्रस मार्ग काढतील आणि एक संयमीत सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. ट्रस यांच्या सर्व उमेदीच्या आश्वासनांना आणि धोरणांना यश मिळावे हीच सदिच्छा.
[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)






























































