दीपशिखा – देवयानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयश्री संगीतराव

महाभारतातील नायिकांमध्ये पाचार्य आणि इंद्रकन्या जयंतीची रूपवती पुत्री देवयानी हे आणखी एक नाव डोळ्यांसमोर येतं. पाचार्य म्हणताच डोळ्यांसमोर येतं ते संजीवनी मंत्रासाठी केलेली तपश्चर्या, देवदानव संघर्ष आणि कोपिष्ट स्वभाव, जो त्यांच्या कन्येत देवयानीत पूर्णपणे उतरलेला होता. खरं तर देवयानीचा महाभारताशी किंवा त्या कुळाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. तरीही क्रोध, मानापमान, बदला आणि गर्विष्ठपणासाठी प्रसिद्ध असलेली देवयानी सूड बुद्धीने ऋषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठेला आपली दासी बनवून घेऊन गेली. इथेच तिचं दुर्दैव म्हणावं की कुरू वंशाचं सुदैव म्हणावं? तिचा पती ययाती याच्यापासून शर्मिष्ठेला झालेला पुत्र पुरुरवा पुरू वंशाचा पूर्वज ठरला. आपल्या पूर्वायुष्यात डोकावताना तिला आपल्या गैरवर्तणुकीचा नक्कीच पश्चात्ताप झाला असेल. कदाचित तिने त्याबद्दल उच्चार करून आपल्या मनातील खंत बोलून दाखवली असेल. तिच्याच शब्दांत तिच्या मनातली ही खंत…

“शर्मिष्ठे, ऐक ना! आहेस कुठे? अगं, ययाती महाराजांचं वार्धक्य जाऊन त्यांना परत तारुण्य मिळालंय!” मी अक्षरश आनंदाने ओरडून सांगू लागले. “शर्मिष्ठे, शर्मिष्ठे…” अशा जोरात हाका मारत मी तिच्या दालनात प्रवेश केला. आनंदाने मी इतकी बेभान झाले होते की, तात पाचार्यांच्या शापाने मिळालेले वार्धक्य त्यांच्याच उ:शापानुसार कोणी स्वीकारले की, ज्यामुळे महाराजांना त्यांचं तारुण्य परत मिळालं, हे जाणून घेण्याचंही मला भान नव्हतं. माझ्याच नादात मी तिच्या दालनात शिरले. खाली मान घालून बहुधा ती रडत होती. मी तिच्या जवळ गेले. “अगं, आता रडू नकोस. सगळं छान झालंय” असं म्हणताच तिचे हुंदके अधिकच वाढले. तेवढय़ात माझं लक्ष मंचकाकडे गेलं. तिथे गलितगात्र, अगदी कृश व्यक्ती पडलेली बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो शर्मिष्ठेचा पुरू होता. म्हणजे पित्याला त्याने शापमुक्त केलं होतं, स्वत: वृद्धत्व पत्करून. हे सारं बघून माझी मती कुंठीत झाली. मी स्वतच बडबडू लागले. “नाही… मी नाही याला जबाबदार. मान्य आहे, आजवर मी तुझ्यावर खूप अन्याय केला.” मी शर्मिष्ठेला मिठीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले. माझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबात मला माझ्या गतस्मृती दिसू लागल्या. मी भूतकाळात केव्हा पोहोचले, मलाच कळलं नाही. शर्मिष्ठा आणि मी समवयस्क बालमैत्रिणी. गुरू पाचार्यांची मी कन्या. तर ती दैत्यराज वृषपर्वांची.

मी हट्टी, दुराग्रही, अहंकारी आणि बाबांसारखी कोपिष्ट, तर ती शालीन, समजूतदार, हळुवार, सालस स्वभावाची. सतत सर्वांचे मन जपणारी. मला कायम तिच्यापेक्षा श्रेष्ठ ठरावं असंच वाटायचं. अंगिरस पुत्र कच बाबांकडून संजीवनी विद्या शिकण्यासाठी आश्रमात आला. कच अतिशय हुशार, देखणा आणि अतिशय अदबीने वागणारा. मला तो आवडू लागला होता. माझ्या अहंकारी स्वभावाबद्दल तो सतत मला टोकत असे. त्याने माझ्या चुका दाखवायच्या आणि शर्मिष्ठेच्या वागण्याचं कौतुक करायचं, हे मला पटणारं नव्हतंच. त्यातच त्याने माझी लग्नाची मागणी डावलली. मी चांगलीच डिवचले गेले. शर्मिष्ठेमुळेच तो मला नाकारतोय असंच मला वाटलं. त्यात आणखी एक घटना घडली. आम्ही सगळ्या सख्या उपवनात जपीडेसाठी गेलो होतो तेव्हा पाण्यातून बाहेर आल्यावर चुकून शर्मिष्ठेने माझी वस्त्रं परिधान केली. दोघींच्याही वस्त्रांचा रंग सारखाच होता म्हणून ती चूक घडली, पण मला भयंकर राग आला. कारण ते वस्त्र मला कचाने दिलं होतं. आमच्यात झटापट, पळापळ झाली व मी चुकून काटय़ाने झाकलेल्या विहिरीत पडले. निर्मनुष्य जागा, सगळ्या सख्या निघून गेलेल्या. माझं ओरडणं ऐकून कोणीतरी तरुण तिथे आला. त्याने आपल्या बाणांनी विहिरीत कमळ तयार केलं व मला हात देऊन बाहेर काढलं. ते राजबिंडं रूप, त्याचा पराम बघून तो कोणीतरी राजपुत्र आहे हे कळायला मला वेळ लागला नाही. क्षणात त्याच्याशी विवाहाचा विचार मनात थैमान घालू लागला. बहुधा माझं रूप बघून त्याचीसुध्दा तीच अवस्था झाली होती. आम्ही आश्रमात परत आलो. त्याची राणी बनून कचाला आपलं ऐश्वर्य दाखवण्याची संधी आहे असा विचार करून, “मी एकदा तुमच्या हातात दिलेला हात कदापि सोडणार नाही” असा हट्ट धरून बसले. बाबा पण या विवाहाला तयार झाले. आता मी दुसरा डाव टाकला. शर्मिष्ठेने माझा अपमान केला व मला विहिरीत लोटले. तिला शिक्षा व्हायलाच हवी. माझा त्रागा बघून बाबाही गरजले, “हे होणार नसेल तर मी हे राज्य सोडून जाईन.” प्रत्यक्ष पाचार्यांसारख्या योग्याने हे बोलल्यानंतर वृषपर्वा राजा म्हणजे शर्मिष्ठेचे पिता, त्यांनीही वचन दिले की, माझी लेक आपण द्याल ती शिक्षा आनंदाने स्वीकारेल. माझ्यातील द्वेष आणखी उफाळला आणि मी शिक्षा सुनावली, “माझ्या विवाहानंतर शर्मिष्ठेला माझी दासी बनून माझ्यासवे यावं लागेल.” सर्वांवर जणू वीजच कोसळली, पण शर्मिष्ठेचा समजूतदारपणा इथेही दिसला. पित्याच्या वचनपूर्तीसाठी तिने आपलं आयुष्य डावावर लावलं, पण इथेच माझं नशीब माझ्या चुकीवर हसू लागलं. डावावर ती नाही, माझं दुर्दैव लागलं होतं. नव्हे, मीच माझ्या हाताने लावलं होतं. मला हे कळलंच नाही. मी तिला दासी म्हणून खूप त्रास देऊ लागले. रात्र रात्र माझ्या दालनाबाहेर उभी ठेवू लागले. महाराजांना माझं हे वागणं पटलं नव्हतंच. शेवटी व्हायचं तेच झालं. मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. शर्मिष्ठेच्या सौंदर्याने आणि गुणांनी महाराजांना तिने जिंकले. त्यांनी तिच्याशी गांधर्व विवाह केला आणि महाराज ययातीच्या पुत्राची ती आई बनली. माझा संताप टोकाला गेला. बाबा तपश्चर्या करून आल्यानंतर मी ही सर्व बातमी त्यांच्या कानावर घातली. आपल्या लेकीवर झालेला अन्याय बघून ते संतापले आणि महाराजांना “तुला तात्काळ जर्जर वृद्धत्व येईल” असा शाप देऊन मोकळे झाले. क्षणात महाराजांचं रूप बदललं. त्यांची ही अवस्था बघून मी मात्र घाबरले. बाबांच्या पाया पडून “शाप मागे घ्या” म्हणून गयावया करू लागले, पण पाचार्य ते! ते कसले मागे फिरणार? शेवटी त्यांनी उ:शाप दिला. त्यांचे वार्धक्य कोणी घेतलं तरच त्यांना त्यांचं तारुण्य परत मिळेल. उ:शाप तर शापापेक्षाही भयंकर होता. कोण स्वतचं आयुष्य पणाला लावणार?

सारे राज्य शोकमग्न झाले. बाबा आले तसे निघून गेले परत तपश्चर्या करण्यासाठी. दिवस उगवत होता, मावळत होता. आमचं जीवन मात्र अंधकारमय होतं, पण त्या दिवशी सूर्य उगवला तो वेगळंच काहीतरी घेऊन. महाराजांचं तारूण्य परत आलं. मी पुन्हा भानावर आले. शर्मिष्ठा मात्र पुतळा बनली होती. मी तिला ह्रदयाशी धरलं. जे जन्मभर जमलं नाही ते एका क्षणात पुरूच्या त्यागाने मला बदलून टाकलं. मी वारंवार तिची माफी मागू लागले. आपली चूक कबूल करू लागले आणि क्षणात मी बोलून गेले, “शर्मिष्ठे, मी बाबांना परत आणीन. आपल्या पुरूला यातून बाहेर काढीन.” कालांतराने मी माझा शब्द पाळला. पुरू पूर्ववत झाला. बाबांच्याच उ:शापाने. वारंवार तिला टोचून बोलणारी ही देवयानी बोलू लागली, “शर्मिष्ठे, तुझ्या पुरूच्या नावाने आपला वंश पुढे चालेल. त्रिभुवनात त्याची कीर्ती पसरेल आणि सुमाता म्हणून तू जगात ओळखली जाशील. तू जिंकलीस शर्मिष्ठे, तू जिंकलीस! तुझ्या आचरणाने, वागण्याने . ही देवयानी मात्र तुझ्या समोर अगदीच खुजी राहिली, पण आता मला ते मान्य करायला जराही लाज वाटत नाही. कारण ईश्वर न्यायनिवाडा नक्कीच करत असतो . मला मान्य आहे ईश्वरा, तुझा न्याय मला मान्य आहे.”

आयुष्याच्या उत्तरार्धात
स्वीकारते मी हार माझी
कर्तव्यपालन करता करता
हरणेच ठरली जीत तुझी शर्मिष्ठे…
हरणेच ठरली जीत तुझी.

– [email protected]@gmail.com