संवादिनी – परदेशी मातीत साहित्याचं रोपटं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> लता गुठे

चार-पाच वर्षांपूर्वी ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांची आणि माझी एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भेट झाली. कार्पामाच्या मनोगतामध्ये स्मिता भागवतांच्या विद्वत्तेची झलक पाहायला मिळाली आणि एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याची छाप माझ्या मनावर उमटली. कार्पाम संपल्यानंतर आम्ही दोघी भेटलो. एवढय़ा मोठय़ा लेखिकेची ते प्रेमाची, मायेची थाप मिळाली आणि पुढे यथावकाश स्मिताताईंनी त्यांची ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा‘ ही कादंबरी माझ्याकडे प्रकाशनासाठी सुपूर्द केली आणि ती मी भरारी प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केली. त्यानंतर अनेकदा आमच्या भेटीगाठी झाल्या आणि प्रत्येक भेटीमध्ये स्मिताताई नव्याने समजू लागल्या.

स्मिता भागवत यांचा जन्म अहमदाबाद येथील बडोदे गावात पुरोगामी विचारांच्या कप्तान कुटुंबात झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले आणि शिक्षणही पूर्ण झाले. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती या चारही भाषांमध्ये सातत्याने लिखाण करणाऱया स्मिताताई कॅनडाला वास्तव्यास असूनही मराठी भाषेचा अभिमान त्या सातत्याने जपण्याचा प्रयत्न करतात. स्मिताताईंना ‘नव्या शतकातील आशास्पद कादंबरीकार‘ म्हणून गुजराती साहित्य परिषदेकडून गौरविण्यात आले आहे

खरं तर महाराष्ट्रातून कॅनडाला जाऊन तिथे चाळिशीनंतर स्थिरावणं आणि साहित्य क्षेत्रात स्वतचा वेगळा ठसा उमटवून स्वतचे अस्तित्व निर्माण करणं हे स्मिताताईंसाठी सोपं नव्हतं. कष्टाने परक्या भूमीत आपल्या प्रतिभेच्या आणि सृजनशीलतेच्या जोरावर आत्मविश्वासाने उभे करणे किती अवघड गोष्ट आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि कॅनडा अशा विविध देशांमध्ये त्यांचा भरपूर वाचक वर्ग आहे. आजच्या डिजिटल माध्यमांचा वापर करून स्मिताताईंनी त्यांची पुस्तकं ई- बुक केली आहेत आणि अमेझॉन किंडलवर उपलब्ध करून दिल्यामुळे कुठल्याही देशांमध्ये ते सहज उपलब्ध होतात. देशविदेशांमध्ये अनेक कथाकथनाचे कार्पाम केले आहेत. तसेच कॅनडाला वास्तव्यास असल्यामुळे तेथे गेली अनेक वर्षे त्या समुपदेशनाचे कार्य करत आहेत. सुमारे पावणेतीन हजार गरजूंना त्यांनी समुपदेशन केले आहे आणि तेही विनामूल्य. या काळात त्यांना अनेक प्रकारची माणसं भेटली. अनेक गरजू विद्यार्थी, शिक्षक पालक, पती-पत्नी अशा अनेकांना स्मिताताईंनी समुपदेशन करून त्यांच्या समस्या दूर केल्या आहेत. यासाठी त्यांना फ्रान्स आणि इंग्लंड या देशांतील काही संस्थांकडून विचार सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

समुपदेशन ‘कालचे,आजचे आणि उद्याचे’, ‘अवचित पडल्या गाठी’ अशा विषयांवरील दोन हजारांपेक्षा जास्त कार्पाम कॅनडा दूरदर्शन, डब्ल्यू चॅनलवर एकहाती अर्धा तास पेलवणारी पहिली आशियन महिला (झ्rदराम्t – taत त्ग्व ग्t ग्s) wदत्d म्at ग्dाहूग्tगे या साखळीतील 22 गुजराती, 11 मराठी, 7 इंग्रजी आणि 3 हिंदी अशा विविध भाषांतील साहित्यकृतींचा समावेश आहे. ही ग्रंथसंपदा ग्रंथाली, मोरया, भरारी अशा नामांकित प्रकाशनांनी प्रकाशित केली आहे.

प्रत्येक 15 ऑगस्टला ाढांतिवीरांवर आधारित मी जे पुस्तक प्रकाशित करते, त्या पुस्तकाच्या लेखिका स्मिता भागवतच असतात. कारण स्मिताबाई यांचे आईवडील दोघेही ाढांतीलढय़ात सािढय सहभाग घेतलेले पुरोगामी विचारांचे स्वातंत्र्यसेनानी असल्यामुळे स्मिताताईंना ाढांतिवीरांविषयी जास्त आत्मीयता, सहानुभूती आहे. ’लेखणी’ व ‘मातृभूमी सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून स्मिताताई बहुभाषिक, जे अनिवासी हिंदुस्थानी आहेत, त्यांची पुस्तके प्रकाशनात आणतात व नवोदित लेखकांना प्रोत्साहन देतात.

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे स्मिताताईंना अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ’श्वेत प्रेमना रक्तीम पडछाया’ या कादंबरीला 1995 सालचा सर्वोत्तम कादंबरीचा पुरस्कार, गुजराती पुस्तकांना तीन राज्य पुरस्कार, अतिशय मानाचा समजला जाणारा भगिनी निवेदिता, डॉक्टर राजा राममोहन रॉय पुरस्कार स्मिताताईंना मिळाले आहेत. तसेच इये सयाजीचे नगरी’ या चरित्रात्मक ग्रंथास, ‘सावन घण बरसे’ या ऐतिहासिक कादंबरीस महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गुजराती 31 आणि मराठी 40 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

स्मिताताईंची अतिशय महत्त्वाची, एका संस्कृत घराण्यातून आलेल्या व नियतीच्या आघाताने वेश्या झालेल्या एका सुंदर मुलीवर आधारित ‘कोठय़ाच्या गाभाऱयातील दिवली’ नावाची सत्यकथेवर आधारित कादंबरी लगेच प्रकाशित होत आहे. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या सकस लेखनाची पोचपावती आहे. आयुष्यभर जमवलेले संचित हे पुढच्या पिढीला देऊन जायचे आहे हा त्यांचा मौलिक विचार त्यांच्या लेखनाला पुन: पुन्हा प्रेरणा देतो.

कौटुंबिक समस्यांशी झुंजत स्वतला सिद्ध करत स्मिताताईंनी साहित्यिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे.