
मलिका अमरशेख
कारुण्यमयी म्हटल्यावर खरं तर पहिलं नाव आईचंच यायला हवं होतं! आईचं मन कारुण्यानं ओतप्रोत! कारुण्याचं दुसरं नावच आई! लेकराच्या तोंडची ‘आई।’ ही हाक ऐकून पायाआधी काळीज धावते, ते कारुण्य म्हणजे आई. खुपसे मुखवटे सोलल्यावर जीवनाचे सारे तत्त्व कळून आलेली ‘कळवळ्याची जाती’ म्हणजे करुण रस! कारुण्याला सर्वाधिक मानव्याच्या सुंदर स्पर्शाचं कांदण असतं. म्हणूनच ते हिऱ्यासारखे झळाळते नवरसांमध्ये!
खूपसे मुखवटे सोलल्यावर जीवनाचे सारे तत्त्व कळून आलेली ‘कळवळ्याची जाती’ म्हणजे करुण रस! जगात प्रत्येकालाच कधी ना कधी जावं लागतं. त्यातून दुसऱ्याचं दुःख पाहून करुणा वाटते. अशी निरामय सोशीक मानवी भावना म्हणजे करुण रस!
स्वाभाविकपणेच आठवतात दोन महत्त्वाची उदाहरणे. चार्ली चॅप्लिनचा भटक्या. त्याच्या फिल्मचा बेसच मुळी करुण रस! निर्मळ, खळाळत्या हास्य प्रसंगातही त्याने कारुण्यातूनही जे अफलातून व्यक्तिचित्रण केले ते आजही मास्टरपीस आहेत. ‘द किड’ या छोट्या पोराचा अविस्मरणीय अभिनय न् चार्लीचे कारुण्यपूर्ण डोळे… हसता हसता त्याचवेळी डोळ्यांतून टचकन पाणी यावे असे प्रसंग निर्मित करणे सोपे नव्हेच आणि त्याचमुळे शंभर वर्षे झाली तरी चार्ली चॅप्लिन आजही जिवंत आहे. तो कारुण्याची खरी किंमत जाणून होता म्हणूनच. असं म्हणतात, ‘दुःख जितकं सुंदर बोलतं, तितकं सुख बोलत नाही!’ सुख माणसाला मुकं करतं!
दुसरं उदाहरण आहे तथागताचं, सिद्धार्थ नावाच्या बुद्धाचं! असं पूर्वीपासून ऐकत आलोय की, बुद्ध होता राजपुत्र, पण महालाबाहेर पडताना त्यानं एक आजारी, एक वृद्ध आणि एक प्रेत पाहिलं नि मग त्याला प्रश्न पडले की, असं का? न् तो घराबाहेर पडला, पण ते खोटं आहे. बुद्ध पाण्याच्या प्रश्नावरून बाहेर पडला. नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून न् आपल्यामुळे घरातील कुटुंबाला त्रास नको म्हणून नगर सोडण्याचा निश्चय केला…न् ध्यानधारणा करून त्याने एक सत्य मिळवलं – प्रज्ञा, करुणा, शांती. सर्व मानवांबद्दल सारखीच करुणा होती त्याच्या ठायी न् त्यांच्या दुःखावर, प्रश्नावर उपाय काय यासाठी त्यानं शरीर कष्टवलं… अन्यथा तो राजपुत्र! त्याला काय कमी? पण करुणा, सर्व जीवांप्रति करुणा. त्यामुळेच तर तो बुद्ध झाला! जो हजारो वर्षे अजून माणसांच्या विचारात, मनात जिवंत आहे!
करुणेत मोठे बळ आहे, जे तलवारीत नाही. मानव्याची खरी खूण करुणा. एखादा माणूस पडला किंवा फसला तर खूप जण हसतात, पण एखादाच करुणामयी असतो की, त्याला हात धरून उठवायला धावतो. अगदी मराठी साहित्यातले उदाहरण घ्यायचे तर साने गुरुजी! मूर्तिमंत कारुण्य! आज त्या गोष्टींची कुणालाच फारशी आठवण वा पिंमत वाटणार नाही. कारण आजचं जगच प्रॅक्टिकल झालेलं आहे. कारुण्य म्हणजे रडकेपणा, शामळूपणा असं वाटणारं हे जग. यांना चेकचे आकडे कळतात. प्रॉपर्टी, बिझनेस कळतो. माणसांच्या भावना न् मन सोडून बाकी सर्व कळणारी आताची मानवजात.
ज्यांच्या विचारांबरोबर भावनाही सजग असतात अशी कारुण्यमयी माणसं कमीच! नाहीतर ऑक्सिडेंट होताना पण न् जखमी माणसाला पाहून पण मदत न करणारे, त्यांचे पह्टो काढून व्हायरल करणारे हिडीस, विकृत चेहरे पाहिले की, यांना माणूस का म्हणावे? हा प्रश्न पडतो. कारुण्यमयी म्हटल्यावर खरं तर पहिलं नाव आईचंच यायला हवं होतं! आईचं मन कारुण्यानं ओतप्रोत! कारुण्याचं दुसरं नावच आई! लेकराच्या तोंडची ‘आई’ ही हाक ऐकून पायाआधी काळीज धावते, ते कारुण्य म्हणजे आई.
आई – मग ती हिंदुस्थानातली असो अगर परदेशातली, मानव असो वा पशुपक्षी- आईसमोर जगातली कुठलीही अपेक्षा, आशा, लोभ, मोह, हव्यास हे असतंच, पण आई कुठलीही अपेक्षा, आशा न ठेवता फक्त, फक्त आणि फक्त प्रेमच करू शकते. कारुण्य दुबळे नसते. उलट कारुण्याच्या पायीच तर हिरकणी तो भयावह उत्तुंग कडा कराल रात्री बाळाच्या ओढीनं, ताकदीनं उतरली. त्या वीरमातेचा सत्कार खुद्द शिवाजीराजांनीच केला.
कारुण्याला खरं तर अनेक छटा असतात. वरपांगी खंबीर, पोलादी, कडक दिसणारा पुरुष पण लाडकी लेक सासरी चालली की, गदगदतो… कोसळतो… लतादीदींच्या अमृतमयी दैवी आवाजातले ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ ऐकून पंडित नेहरुंसारख्या कणखर नेत्याच्या डोळ्यांत आलेलं पाणी हे अत्यंत हृद्य उदाहरण!
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारं कारुण्य, सौंदर्य व परममांगल्याचं परिपूर्ण हिंदुस्थानी स्त्रीचं प्रतीक म्हणजे आपल्या सुलोचनाबाई व अर्थात मीनाकुमारी! योगायोगाने एकाच अप्रतिम चित्रपटात दोघींनी जी भूमिका केली ती तर गाजलीच! ‘वहिनीच्या बांगड्या’मधली वहिनी सुलोचना आणि त्यावरूनच निघालेल्या ‘भाभी की चुडिया’मधली भाभी मीनाकुमारी – दोघींचे निर्मळ, करुण ममताभरले डोळे. ‘ज्योती कलश छलके’ यातला प्रसंग –
मीनाकुमारीला ट्रजिडी क्वीनच म्हटलं जायचं, पण नुसती ट्रजिडी शोकांतिका म्हणजे कारुण्य नव्हे. मला वाटतं, कारुण्य हे फिल्मइतकंच साहित्यातून फार चांगलं उमटलंय. कारण वर म्हटल्याप्रमाणे कारुण्य हे प्रेमाइतकेच व्यक्तिमत्त्वाला खुलवते. त्याच्या अनेक शेड्स असतात. अगदी शरच्चंद्र चतर्जींचा ‘देवदास’, रवींद्रनाथ टागोरांचा ‘गोरा’, ‘काबुलीवाला’ पिंवा त्यांच्या सर्वच कथांमधल्या पात्रांमध्ये कळवळून टाकणारे, चरका बसावे असे कारुण्य आहे. मराठीमध्ये श्री. ना. पेंडसेंच्या ‘गारंबीचा बापू’मधला बापू, विठोबा, राम गणेश गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’मधला सुधाकर, जगभरात जगप्रसिद्ध अशा सर्वच ग्रीक नाटकांमध्ये तर कारुण्य न् शोकांत हीच हातात हात घालून फिरणारी पात्रं! सोपहक्लिझने लिहिलेली नाटके तर शेक्सपियरने लिहिलेले ‘हॅम्लेट’, ‘पिंग लियर’ हा कारुण्य शोकांतिकेचा चरमबिंदूच! तर रशियात ‘अॅना पॅरेनिना’, लिओ टॉलस्टॉय व मॅक्झिम गॉर्की व चेखोव यांच्या कथांतून, कादंबऱ्यांतून वास्तववादी अभिजात स्पर्श असलेली पात्रं असत. सरतेशेवटी कारुण्याला सर्वाधिक मानव्याच्या सुंदर स्पर्शाचं कांदण असतं. म्हणूनच ते हिऱ्यासारखे झळाळते नवरसांमध्ये!




























































