24/7 सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर, [email protected]

इस्रोने देशप्रेमापायी आणि देशनिष्ठेपायी अंतराळाच्या सीमा ओलांडून सर्वच क्षेत्रात व्यापक प्रवेश केला आहे.

मच्छीमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळावी यासाठी दिशादर्शक उपग्रह, पूर, दुष्काळ यासारखी नैसर्गिक आपत्ती, जीपीएस यंत्रणा, भू निरीक्षण, मानव अवकाशोड्डान कार्यक्रम, उपग्रहांचा वापर, दळणवळण, हवामानशास्त्र्ा या सगळ्याच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी इस्त्रोचे योगदान मोलाचे आहे. विशेष म्हणजे मानवाच्या रक्षणासाठी देशाच्या संरक्षण क्षेत्रातही इस्त्रो महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. दडून बसलेल्या दहशतवाद्यांची तळं शोधून त्यांना अचूक टिपण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा लागतो… यासाठी वेगवेगळ्या उपग्रहांची मदत घेऊन शत्रू राष्ट्रावर हल्ला केला जातो. या उपग्रहांमध्येही इस्त्र्ााsमार्फत सतत नवनवे बदल केले जातात. शिवाय कोणत्या भागात शस्त्र्ाधारी दहशतवादी आहेत, कुठे संशयास्पद हालचाली सुरू आहेत, सॅटेलाईटद्वारे छायाचित्रं काढणे ही सारी कामे इस्त्र्ााsद्वारे तयार करण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या साहाय्याने अचूक पार पाडली जातात. यामुळेच संरक्षण क्षेत्रातलं इस्त्र्ााsचं महत्त्व अधोरेखित होते.

दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी करण्यात आलेल्या या उपग्रहांच्या वापराविषयी अंतराळ प्रशिक्षक अपूर्वा जाखाडी सांगतात, सर्जिकल स्ट्राइकसारख्या मोहिमा आखण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी घेतला जातो. या मोहिमेवर अनेक तज्ञ, संशोधक काम करत असतात. इस्रोकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे कशा प्रकारची कारवाई यशस्वी होऊ शकते, याची कल्पना लष्कराला दिली जाते. सर्जिकल स्ट्राइक्समध्ये वापरण्यात आलेली छायाचित्रे ‘कार्टोसॅट-2सी’ या उपग्रहाने पाठवली जातात. इस्रोनं पाठविलेल्या अशा पाच कार्टोसॅट उपग्रहांची मालिका अवकाशातून जमिनीवर लक्ष ठेवते. कार्टोसॅटची मालिका अवकाशात पाठवायची योजना इस्रोनं 2005 साली सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षमतांचे पाच उपग्रह इस्रोने अवकाशात नेऊन ठेवले आहेत. हे उपग्रह पृथ्वीभोवती घिरटय़ा घालून हव्या त्या ठिकाणची माहिती छायाचित्रांसह लष्कराला पाठवतात.

सर्जिकल स्ट्राइक्ससारखे ऑपरेशन राबवण्यासाठी अचूक माहिती हाती असावी लागते. कारण वेळ कमी असतो आणि आपल्याकडील सैन्याची तसेच सर्वसामान्य, निरागस जनतेची हानीही होऊ नये यासाठी अचूक निशाणा आणि वेळ साधावी लागते. यासाठी सॅटेलाइटचा वापर महत्त्वाचा ठरतो. यासाठी कार्टोसॅट उपग्रहाकडून मिळालेली छायाचित्रे आणि गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती या अभ्यासाच्या बळावर युद्धमोहिमेचे तंत्र अवलंबले जाते आणि युद्धाची मोहिम फत्ते केली जाते, अशी माहिती त्या देतात.

आकाशातला डोळा
कार्टोसॅट या उपग्रहाचा सर्जिकल स्ट्राइकसाठी कसा वापर केला जातो, याविषयी त्या माहिती देतात की, कार्टोसॅट हा उपग्रह असून तो ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जातो. सर्जिकल स्ट्राइक्समध्ये कामी आलेले कार्टोसॅट-2सी सॅटेलाईट हा उपग्रह म्हणजे हिंदुस्थानी संशोधकांनी संरक्षण क्षेत्राला दिलेलं वरदान आहे. केवळ नव्वद मिनिटांत हा उपग्रह पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. या उपग्रहाचा वेग प्रति सेकंद तब्बल 37 किलोमीटर एवढा आहे पण, एवढय़ा वेगात जात असतानाही हा उपग्रह 0.65 मीटर रिझोल्युशनची छायाचित्रं पाठवू शकतो. एवढय़ा वेगातही एका मिनिटाचा व्हिडीओदेखील हा उपग्रह तयार करू शकतो आणि पृथ्वीवर पाठवू शकतो.

नवनवीन उपग्रहांची भर
दहशतवाद्यांवर ड्रोन हल्ले करणे, दहशतवादी संघटनेची पाळेमुळे शोधून काढणे, हे सारेच सॅटेलाईट उपग्रहांच्या मदतीने केले जाते. यासाठी जीपीएस तंत्र, इंटरनेट याची कामगिरीही मोलाची आहे. सध्या केवळ सॅटेलाइट तंत्राचा वापर केला जातो. हिंदुस्थानच्या अवकाशात तब्बल 33 उपग्रह आहेत. त्यापैकी दहा उपग्रह पृथ्वीवर नजर ठेवून आहेत. शत्रूला समूळ नष्ट करण्यासाठी सतत नवनवीन उपग्रहांची भर पडत असते. त्यावर शास्त्रज्ज्ञ सातत्याने काम करत असतात.