>> नम्रता पवार
पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्र. अखंड अभ्यास, संशोधन हाच या संस्थेचा ध्यास. नुकताच त्यांनी पक्ष्यांच्या आणि वृक्षांच्या अनेक नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
डॉ. गगनदीप कंग. पहिल्या हिंदुस्थानी महिला FRS पदवी मिळविणाऱया वैज्ञानिक. लहान मुलांमधील डायरियाबाबतचे त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण आहे.
प्राच्यविद्या संशोधनामध्ये जगभरात नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने पर्यावरण जतन आणि संवर्धनामध्ये योगदान दिले आहे. या संस्थेच्या आवारामध्ये स्थानिक वनस्पतींच्या 80 आणि पक्ष्यांच्या 32 प्रजाती आढळून येतात. संस्थेच्या शताब्दीनिमित्त करण्यात आलेल्या जैवविविधता सर्वेक्षणामुळे ही गोष्ट समोर आली.
पुण्याचे पर्यावरण चांगले ठेवण्यात टेकडय़ांचा महत्त्वाचा वाटा आहे. वेताळ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने सांस्कृतिक वारसा जतन करतानाच आपला नैसर्गिक ठेवा जपण्याच्या उद्देशातून ‘द इकॉलॉजिकल सोल्यूशन्स’ संस्थेच्या कार्याध्यक्ष्या संध्या राजेशिर्के यांनी संस्थेच्या आवारातील जैवविविधतेचे सर्वेक्षण केले.
या प्रकल्पांतर्गत एक वर्षांच्या कालावधीत सर्व ऋतूंमध्ये संस्थेच्या आवारात आढळणाऱया विविध वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक यांची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचे नैसर्गिक कार्य, परस्परसंबंध, ऋतूनुसार होणारे बदल, स्थानिक आणि परदेशी प्रजाती अशा विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला. तसेच तेथील काही आवर्जून जतन करण्यायोग्य ठराविक झाडांची नोंद करण्यात आली.
संस्थेच्या पूर्ण आवारात छोटय़ा वनस्पती, वेली, झुडपे आणि झाडे मिळून स्थानिक वनस्पतींच्या एकूण 80 प्रजातींची नोंद केली गेली. त्यामध्ये किनई, शिरीष, खिरणी, टेमरू, बहावा, कांचन ,मोह, कुंती, कळम, अर्जुन, सीता, अशोक या झाडांचा समावेश आहे. टेकडीच्या आवारात खैर, हिवर, सालई, बारतोंडी, मोई अशा काही वनस्पती नैसर्गिकरित्या आढळतात. याबरोबरच नीलमोहोर, शंकासूर, गुलमोहोर, गिरिपुष्प असे परदेशी वृक्षही येथे आहेत.
भांडारकर संस्थेच्या परिसरात पिंगळा, धनेश, हळद्या, नाचण, तांबट , लावरी, सातभाई, दयाळ, चष्मेवाला, शिजीर, सुभग, राखी वटवटय़ा पक्ष्यांच्या 32 प्रजाती आढळून आल्या. त्याचबरोबर विविधरंगी फुलपाखरे आणि पतंग यांच्या 30 जातींची नोंद करण्यात आली आहे. किटकांचे वेगवेगळे 20 प्रकार, बेडूक, सस्तन प्राणी आणि कोळी अशा प्राण्यांच्या दहा प्रजाती आढळतात. वाढत्या शहरीकरणाच्या काळात जैवविविधतेचे संवर्धन करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. हिंदुस्थानचे पहिले आधुनिक स्वदेशी इतिहासकार म्हणून डॉ. भांडारकर यांना ओळखलं जातं. आज ही संस्था जगभरातील विविध ग्रंथांचे संकलन, माहिती संशोधन, समन्वेषण आणि सर्वेक्षण याबरोबरच संशोधन आणि शिस्त म्हणून नावलौकिक मिळवून आहे.
भांडारकर इन्स्टिटय़ूटमधील ग्रंथसंपदा
डॉ. भांडारकर यांनी पुण्यात वेताळ टेकडीच्या पायथ्याशी 2700 ग्रंथसंपदा घेऊन भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराची स्थापना केली. आज 102 वर्षांनंतर ही ग्रंथसंपदा काही लाखांच्या घरात पोहोचली आहे. आठव्या शतकापासून ते 16 व्या शतकापर्यंतची 28 हजार हस्तलिखिते आहेत. 550 हस्तलिखिते आयुर्वेदातील आहेत. संस्थेकडे हस्तलिखित ग्रंथ विभाग, प्रकाशन विभाग, शोध विभाग, महाभारत विभाग आहे.
संस्थेच्या संग्रहातील ऋग्वेदाच्या पोथींची नोंद युनेस्कोच्या विश्व स्मृती सूचीमध्ये घेण्यात आलीय. संस्थेच्या ग्रंथालयात 1,30,000 पुस्तकं, नियतकालिकं आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांच्या नावलौकिक आहे. डॉ. पां. वा. काणे यांच्या पाच दशकांच्या परिश्रमातून साकार झालेला ‘अर्थशास्त्र्ााचा इतिहास’ हे संस्थेचे महत्त्वाचे प्रकाशन आहे. पाच खंडांचा सुमारे 6200 पानांचा हा ग्रंथ जगभर अभ्यासला जातो.
मॅक्सम्युलरने ऋग्वेदाचा अनुवाद करण्यासाठी वापरलेली संस्थेतील ऋग्वेदाच्या हस्तलिखितांची नोंद युनेस्कोच्या विश्व स्मृती सूचीमध्ये घेण्यात आली आहे. हिंदुस्थान सरकारच्या ‘नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स’ या अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे केंद्र भांडारकर संस्थेत आहे. शिवाजी महाराजांच्या दरबारातील कविभूषण, जे 1672 च्या सुमारास राजदरबारात होते, 1730 मधील त्यांचे एक हस्तलिखित, जे महाराजांवर केलेल्या काव्याचं आहे, फाळके नावाच्या एका विद्यार्थ्याने त्याचं भाषांतर करून त्यावर पीएच.डी. करून ‘शिवभूषण राजा’ या नावाचं पुस्तक लिहिलंय. महाभारताची संस्कृतमधील मूळ संहिता इंग्रजी व मराठीत लवकरच उपलब्ध. अशी अनेक विविध प्रकारची प्राचीन ग्रंथसंपदा संस्थेत आहे.
नवीन उपक्रम आणि आधुनिकतेची कास
वीस हजार पुस्तकांचं www.borilib.com हे स्वतःचं ई-ग्रंथालय संस्थेने सुरू केलंय. तसेच मॅन्युस्क्रिप्टदेखील इंटरनेटवर लवकरच उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच विविध चर्चासत्रांचं आयोजन करण्यासाठी संस्थेच्या इमारतीत सुसज्ज हेरिटेज ऑडिटोरियम उभारलं आहे. इंडोनेशिया, जपानसारख्या देशात अनेक देवळं आहेत, परंतु त्यांची योग्य ती माहिती देण्यासाठी अभ्यासू व्यक्तींचा अभाव आहे. यासाठी यंदा ऑगस्टमध्ये इंडॉलॉजीचे कोर्सेस सुरू होणार आहेत.
फंडिंगची समस्या आणि इन्फोसिस फाऊंडेशनचा मदतीचा हात
भांडारकर इन्स्टिटय़ूटमध्ये प्राच्य म्हणजेच पौर्वात्य (संस्कृती, पाली आणि प्राकृत) भाषांचा अभ्यास प्रामुख्याने होतो. यासाठी अनेक देशविदेशातील विद्यार्थी इथल्या ग्रंथांच्या मदतीने संशोधन करीत असतात, परंतु परदेशी विद्यार्थी अधिक प्रमाणात इथे संशोधन करीत होते, तर आपल्या देशात सर्व उपलब्ध असूनदेखील पाहिजे तेवढे संशोधन होत नसल्याची खंत कार्यकारी मंडळाला जाणवत होती याचं एकमेव कारण होतं फंडिंग. ही बाब लक्षात घेऊन कार्यकारी मंडळाने इन्फोसिस फाऊंडेशनकडे मदतीचा हात मागितला.
इन्फोसिस फाऊंडेशन हे समाजातील विविध क्षेत्रांत तळमळीने काम करणाऱया संस्थांना कायम योगदान करीत आलेय. सुधा मूर्ती यांनी संस्थेचं हेरिटेज ऑडिटोरियमचे काम पाहून भांडारकर इन्स्टिटय़ूटला दरवर्षी दोन कोटी रुपये द्यायचे कबूल केले आणि ते फंडिंग त्वरित दिलंदेखील.पूर्वी पीएच.डीच्या विद्यार्थ्याला योग्य तो मोबदला देता येत नव्हता. इन्फोसिसच्या मदतीने अनेकांना तो मोबदला देणं शक्य झालं.






















































