
>> प्रशांत गौतम
41व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन दीड-दोन वर्षांपूर्वी नांदेड जिल्हय़ातील देगलूर येथे ठरले. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार व देगलूरचे भूमिपुत्र बाबू बिरादार यांची निवडही तेव्हाच झाली होती. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मसापचे संमेलनही प्रदीर्घ काळ लांबत गेले. तेच संमेलन 25 व 26 सप्टेंबर या कालावधीत संभाजीनगरात आयोजित करण्यात आले. बाबू बिरादार यांना संमेलन अध्यक्ष पदाचा बहुमान जो त्यांच्या गावी मिळायचा होता तो आता मराठवाडय़ाच्या राजधानीत मिळतो आहे. बिरादार हे मराठवाडय़ातील प्रतिभावंत व सशक्त ताकदीचे कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. नांदेड जिल्हय़ातील देगलूर तालुक्यात काठेवाडी या गावात त्यांचा जन्म 6 जून 1952 साली झाला. एम.ए. मराठी शिक्षण झाले असले तरी ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत निरीक्षक म्हणून कार्यरत होते. एम.ए. मराठी असल्याने त्यांना लेखन-वाचनाची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली. नोकरीच्या निमित्ताने सहकार बँक कार्यप्रणालीचा जवळून त्यांनी अनुभव घेतला. कादंबरी हाच वाङमय प्रकार त्यांनी निष्ठापूर्वक हाताळला. गेली चार दशपं कादंबरीसारखा प्रदीर्घ भाषिक अवकाश व आशयाचा व्यापाक पट बाबूरावांनी आपल्या साहित्य प्रकारात आणला. बाबूरावांच्या लेखनाची आयुष्याची जडणघडणच काठेवाडीसारख्या त्रैभाषिक प्रदेशात झाल्याने त्याचे प्रादेशिक पडसादही त्यांच्या लेखनात उमटत गेले. बाबूरावांची खासिएत अशी की, या लेखकाने चार दशकात फक्त 6 कादंबऱयांचे कसदार, दमदार लेखन केले. मातीखालचे पाय (1980) (संगत प्रकाशन, नांदेड, कावड श्री विद्या प्रकाशन पुणे 1982, गोसावी (1994) साकेत प्रकाशन, संभाजीनगर, अग्निकाष्ठ (1995), अंतःपुरुष (2002), देशमुख प्रकाशन पुणे आणि सहावी कादंबरी, संभूती ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मानवी जीवनाच्या तळाचा शोध घेणे, मानवी जीवनात विपृतीसह माणूस समजून घेणे, त्याच्या अतर्क्य अशा मानवी वर्तन आणि व्यवहाराचा शोध घेणे, ही कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या लेखनाची भूमिका राहिलेली आहे. या सहा कादंबरीतील ‘माती खालचे पाय’ या कादंबरीचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ए.ए.च्या अभ्यासक्रमात तर कावड कादंबरी आणि गोत्र ही कथा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
बाबू बिरादार हे त्रैभाषिक प्रदेशातील असल्याने त्या भागातील सांस्पृतिक, प्रादेशिक व जैविक वैशिष्टय़ासह कादंबरी लेखन झालेले आहे. त्या प्रदेशातील माणसांचे चित्रण त्यांनी फार प्रभाविपणे केले आहे. पात्रांच्या अंतरंगाचा, मानवी वर्तन आणि व्यवहाराचा शोध ते नेमकेपणाने घेतात. मानवी स्वभावाचे मनोविश्लेषणही उत्तम करतात. परिणामी त्यांच्या अनेक कादंबरी लेखनात मानवी पृती, प्रवृत्ती नव्या स्वरूपासह येतात. एवढंच नव्हे तर कादंबरीकार सशक्त ताकदीचा असल्याने बदलेल्या व बदलत जाणाऱया मानवी पृती, प्रपृती याचे लिखानही ते मनोज्ञ करतात. काही कादंबरी लेखनातून त्यांचे संवेदनाक्षम मन अभिव्यक्त होताना दिसते. संवेदना सूचित करणारी भाषा त्यांना अवगत असल्याने निवेदनातील काव्य व नाटय़ ते नेमकेपणाने टिपतात, तर काही कादंबरी लेखनात ग्रामीण भागातील पर्यावरण, शेतकऱयांचे विश्व, त्यांचे सुख-दुःख, त्यांची शेतीनिष्ठा याचा व्यापक दृष्टिकोनातून लेखक वेध घेतात. यातील एक लक्षणीय कादंबरी म्हणजे ‘अग्निकाष्ठ’ ही होय.
विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमासाठी असलेली महत्त्वपूर्ण कादंबरी म्हणजे ‘मातीखालचे पाय’ होय. बदलत जाणाऱया माणूसपणाचा त्यातील वृती-प्रवृत्तीचा वेध लेखक साक्षेपाने घेतात. त्यातील चित्रण हे प्रभावी आहेच; पण प्रत्ययकारी व मानवी भाव-भावनांचा शोध घेणारे आहे. दुःखाची भळभळती जखम घेऊन अनेक माणसे तक्रार न करता जीवन जगतच असतात. त्या प्रातिनिधीक माणसाची दीर्घ कथा म्हणजे ही कादंबरी होय. ‘कावड’सारख्या पण वेगळय़ा विषयावरील कादंबरीत लेखकाने अध्यात्म आणि वासना य दोन्ही संघर्षात होरपळ होणाऱया गोरख मास्तरचे चित्रण रेखाटले.
मराठवाडय़ातील कसदार कादंबरीकाराचा साहित्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरव झाला आहे. मात्र उशिरा का होईना त्यांना मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्ष पदाचा सन्मान लाभला, हेही नसे थोडके.




























































