
>> सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर
घरातील स्त्री – मग ती हाऊसवाईफ असो वा नोकरी करणारी असो – ती रमते ती तिच्या किचनमध्येच. त्यामुळे घर डिझाईन करताना स्वयंपाकघराकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
स्वयंपाकघर डिझाईन करताना तीन गोष्टींकडे लक्ष द्यावे ते म्हणजे होब अर्थात शेगडी, सिंक व फ्रिज. बघा, तुमच्या स्वयंपाकघरात या तीन महत्त्वाच्या जागा जर नीट बसवल्या असतील तर काम झटपट व्हायला मदत होते. साधारणतः या गोष्टी त्रिकोणात असाव्यात.
– किचनमध्ये वावरण्यासाठी योग्य जागा असावी. प्लॅटफॉर्म जर तुम्ही समोरासमोर घेत असाल तर मधला पॅसेज कमीत कमी तीन ते साडेतीन फूट तरी असावा वा ‘एल’ प्लॅटफॉर्म असेल किंवा ‘सी’मध्ये असेल तर वावरण्याची जागा नीट सोडलेली असावी की, एका वेळेस सिंक व शेगडीचा वापर न धडपडता होईल तसेच दोघातिघांना एका वेळेस कूकिंग असो, कटिंग चॉप्पिंग असो वा सिंकवर, काम सहजपणे करता यावे.
– शक्यतो शार्प कॉर्नर्स टाळावेत, जेणेकरून काम करताना इजा होणार नाही. प्लॅटफॉर्मची उंची किती असावी? मायक्रोवेव्ह कुठल्या जागेवर असावा? त्याची उंची काय असावी? भांडी त्याच्या जवळपासच्या ड्रॉवर्स किंवा पॅबिनेटमध्ये असावीत, गरम वस्तू काढल्यावर ती ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म असावा अशा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
– शेगडीच्या खाली शक्यतो कटलरी, कप अँड सॉसर व थाळी रॅक असावेत व मसाला पुलआऊट त्याजवळ असावा. सिंकच्या खाली डिटर्जेन्ट पुलआऊट, डस्टबिन ठेवावे. डिशवॉशर जर असेल तर ती सिंकच्या जवळ असावी.
– शेगडीच्या बरोबर वर चिमणी असावी व खालचे ड्रॉवर्सही त्याच रांगेमध्ये असावेत. चिमणीचे आऊटलेट योग्य रीतीने दिले आहे का ते पहावे व बाहेरून ते नीट जाळी लावून बंद असावे. कांदे, बटाटे, लसूण वगैरे ठेवण्यासाठी विकर बास्केट असावेत. त्यांना शटर्स करू नयेत.
– आजकालच्या आधुनिक किचनमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हपासून फ्रिजपर्यंत सगळं बिल्टइनही ठेवू शकता. म्हणजेच तुमच्या शटर्ससारखे कॉम्बिनेशन्सचे दरवाजे तुम्ही फ्रिज वगैरेला लावू शकता, पण हे करताना टेक्निकल बाबी समजून घ्या.
– बाहेरील रंगसंगतीही महत्त्वाची ठरते. तुमच्या प्लॅटफॉर्मचा रंग व शटर्सच्या रंगाची छान सांगड घालावी. तुमच्या किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश किती येतो ते पाहून रंगसंगतीशी खेळू शकता.
– आजकाल आधुनिक स्वयंपाकघरात स्टील ट्रॉलीपासून ते टँडम ड्रॉवर्सपर्यंत नामांकित पंपन्यांचे खूप फिटिंग्ज उपलब्ध आहेत. कॉर्नर्ससाठी अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तिकडे वेस्टेज होणार नाही व कोपरान्कोपरा तुम्ही वापरू शकता. अर्थात सगळ्यासाठी आर्थिक तरतूदही बघावी लागते. अशा या सगळ्या लहानसहान गोष्टींचा अभ्यास करून जर का तुम्ही तुमचे स्वयंपाकघर सजवलेत तर घर पण सुंदर दिसेल, घरवाली पण खुश राहील व रोज नवनवीन मेजवानी तुमच्यासाठी तयार असेल.


























































