>> दिलीप जोशी
दिग्गज मराठी मंडळींनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात हिंदुस्थानभर जनजागृती केली. त्यातील राजकीय गुरुशिष्यांच्या दोन प्रसिद्ध जोडय़ा म्हणजे भारतसेवक गोखले आणि त्यांचे शिष्य महात्मा गांधी तर लोकमान्य टिळक आणि त्यांचे शिष्य न.चिं. तथा तात्यासाहेब केळकर.
इंग्रजी सत्ता हिंदुस्थानात पूर्णपणे स्थिरावल्यानंतर देशातली एकेक संस्थानं, राज्यं त्यांनी खालसा केली. त्यानंतरचा म्हणजे एकोणीसाव्या शतकाचा काळ. म्हाराष्ट्रात सामाजिक समतेची, आधुनिक शिक्षणाची आणि देशव्यापी राजकारणाचीही सुरुवात झाली. पुणे शहर त्यात अग्रभागी होते. तिथेच महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे दूरदृष्टीचे समाजक्रांतिकारक उदयाला आले. विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांनीही सामाजिक समतेचा पुरस्कार केला. सर्वच क्षेत्रात दिग्गज मंडळी महाराष्ट्रात निर्माण झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर दलित, शोषित समाजात प्रचंड जागृती केली. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हिंदुस्थानवर महाराष्ट्राचा प्रभाव होता.
ब्रिटिश काळातील आधुनिक राजकीय क्षेत्रात ते स्थान लोकमान्य टिळक यांना मिळालं होतं. पुढे टिळकांच्या पश्चात देशाच्या राजकारणाची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे गेली. मात्र गांधीजींचे गुरू पुण्याचे गोपाळ कृष्ण गोखले होते. विविध विचारधारांचे उत्तुंग नेते इथे वावरत होते. मुंबईत दादाभाई नवरोजी आणि फिरोजशहा मेहता होते. काँग्रेसच्या स्थापनेनंतर (1885) देशाच्या राजकारणाचं पेंद्र मुंबई झालं.
अनेक विचारांच्या नेत्यांमध्ये, सशस्त्र्ा क्रांतीचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, जहाल पण सनदशीर राजकारण करणारे लोकमान्य टिळक आणि गोखले यांच्या ‘स्पिरिच्युअल पॉलिटिक्स’चा संदेश घेऊन सत्याग्रहाचा मार्ग अवलंबिणारे महात्मा गांधी या देशाच्या तिन्ही राजकीय प्रवाहांचं उगमस्थान महाराष्ट्रातच होतं. दिग्गज मराठी मंडळींनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात हिंदुस्थानभर जनजागृती केली. त्यातील राजकीय गुरुशिष्यांच्या दोन प्रसिद्ध जोडय़ा म्हणजे भारतसेवक गोखले आणि त्यांचे शिष्य महात्मा गांधी तर लोकमान्य टिळक आणि त्यांचे शिष्य न.चिं. तथा तात्यासाहेब केळकर.
न.चिं. केळकर उत्तम साहित्यिक होते. वक्ते होते. वकिलीची पदवी घेतलेल्या केळकरांनी नाटपं लिहिली. कादंबऱया लिहिल्या. टिळकांच्या पश्चात ‘केसरी’चे अग्रलेख लिहिले. आता फारशी ठाऊक नसलेली त्यांची नाटपं अनेक पण त्यातील ‘तोतयाचे बंड’ आणि ‘कृष्णार्जुन युद्ध’ ही नाटपं त्या काळात गाजली. ‘अंधारवेध’, ‘बलिदान’, ‘कोकणचा पोर’ अशा त्यांच्या काही कादंबऱया तर ‘काव्योपाहार’, ‘पद्मगुच्छ’ असे कवितासंग्रह. ‘गावगोष्टी’ हे त्यांचं आत्मकथनात्मक पुस्तक तर टिळकांच्या विस्तृत चरित्राचं लेखन तसेच ‘आयर्लंडचे राष्ट्रवीर’ असा त्यांचा व्यापक लेखनप्रपंच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन महिन्यांनी केळकर गेले. टिळक-गांधी युग, स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्राप्ती हे सर्व त्यांनी पाहिले. 1923 ते 29 या काळात ते पेंद्रीय प्रतिनिधी सभेवर (त्या वेळची संसद) निवडून गेले होते.
माझ्याकडे त्यांच्या आवाजातील जे भाषण आहे ते त्या वेळच्या तरुणांना उद्देशून आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘तरुण मित्रांनो, तुम्हाला मी काही सांगणार आहे. वृद्धांना मी काय संदेश देणार. तो त्यांना अनुभवाने मिळालेलाच आहे आणि अनुभवासारखा शिक्षक दुसरा नाही. तर चोवीसाव्या वर्षी मी घरी कोणालाही न सांगता साताऱयाहून पुण्याला निघून आलो. अरे हसता काय… मी घर सोडण्याचं कारण म्हणजे कधी न मिळण्यासारखे असे टिळकांचे सान्निध्य, त्यांचा मित्र आणि सेवक म्हणून संपादकीय काम करण्याची (‘केसरी’मध्ये) सोन्यासारखी उत्कृष्ट संधी मला अवचित मिळाली. म्हणूनच मी साताऱयाहून पुण्याला आलो यालाच मी ‘पळून’ जाणं असं म्हणतो. उत्कर्षाची संधी मिळताच तरुणांनी ती साधायला हवी. मात्र त्यासाठी आत्मविश्वास आणि स्वाभिमान असायला हवा. प्रतिकूल काळातही आशावादी राहून कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. तरुण वयात कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा शारीरिक श्रम करून उपजिविका करावी. परोपजीवी सुशिक्षितांपेक्षा स्वावलंबी, कष्टकरी कामगार मला अधिक वंदनीय वाटतात.’’
केळकरांचं हे भाषण 1930च्या दशकात ध्वनिमुद्रित झालेलं असावं. त्याचा आशय येथे दिला आहे. खूप जुन्या तबकडय़ांवरचे अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ध्वनिमुद्रित आवाज स्पष्ट ऐकू येत नाहीत. कारण त्या काळातील मेणाच्या ध्वनिमुद्रिका लवकर खराब होत. केळकरांचे भाषण मात्र स्पष्ट ऐकू येते. आता ते ‘डिजिटाईज’ करून ठेवलंय. कारण ‘त्या’ तबकडय़ा वाजवण्याचा ‘पह्नो’ आमच्याकडे असला तरी तो कधीच नादुरुस्त ‘ऑण्टिक पीस’ झालाय. अशा कित्येकांचे दुर्मिळ स्वर नि सूर अज्ञाताच्या पडद्याआड गेले असतील. काही संग्राहकांकडे ते जतन केलेले आहेत हे विशेष.
z [email protected]





























































