फर्स्ट टेक – बालनाटय़ शिबिरातून अभिनयाचा श्रीगणेशा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत

मस्तीखोर, भांडणात सगळय़ात पुढे असणारा हा खोडकर मुलगा. म्हणूनच इयत्ता तिसरीत असताना, बहिणीसोबत बालनाटय़ प्रशिक्षणात त्याला जबरदस्ती पाठवलं गेलं. इथे अभिनय क्षेत्राची गोडी लागली आणि पुढे जाऊन मराठी सिनेसृष्टीला एक होतकरू व्यक्तिमत्त्व मिळालं. आपल्या अभिनय प्रवासाविषयी सांगतोय अभिनेता धैर्य घोलप.

उन्हाळी सुट्टय़ांमध्ये माझ्या मारामारी आणि राडय़ामुळे सोसायटीतील उपद्रव कमी करण्यासाठी बाबांनी मला नाटय़ प्रशिक्षण पेंद्रात पाठवले. बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत मी अभिनयाचे धडे गिरवू लागलो. अभ्यास बुडवून जे काही करता येईल ते मला करायचे होते. इथे आल्यावर हे करू नको ते करू नको असं सांगणारे कोणी नव्हते, त्यामुळे ही मला माझी हक्काची जागा वाटायची. प्रत्येक वर्षी प्रशिक्षण आणि बालनाटय़ सुरू झालं. अस्मिता चित्र अॅपॅडमी जॉइन केलं. तिथे माझे काम बघून स्मिता तळवलकर यांनी बाबांना मला या क्षेत्रात काम करू द्यावे, अशी विनंती केली.

पुढे मी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केलं. दरम्यान, नाटपं सुरूच होती. पॅमेऱयासमोर काम करण्याचा योग आला तो स्मिता तळवलकर यांच्यामुळे. अभिनयाचा पेपर माझ्यासाठी कठीण नव्हता, पण पॅमेऱयाचे तंत्र तितपंच चॅलेंज होतं.  सुदैवाने अस्मिता चित्रमध्ये अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी पॅमेरा तंत्रज्ञानविषयी कार्यशाळा घेतली होती. त्यात मी ऑब्जेक्ट असल्याने मॉनिटरवर कसं दिसतंय हे   जवळून पाहिलं.तरीही शूटिंगचा पहिला दिवस गोंधळ उडवणारा होता.

बाबांना समजावून सांगण्याचा टास्क

बाबा इंजिनीअर बोर्डात आलेले, बहीण 95 टक्केवाली त्यामुळे मला 70 टक्के वगैरे मिळणं बाबांसाठी खूपच बिलो डिग्निटी होतं. एकदा गावी गेलो असताना बाबांचे गावातले मित्र त्यांचे खूप कौतुक करत होते. त्या वेळी बाबांनी सांगितले की, याला काही सांगा, हल्ली मुलं ऐकत नाही अभ्यासाविषयी. तेव्हा बाबांच्या अशिक्षित मित्राने सांगितले की, जसे तू गावातला पहिला इंजिनीअर आहेस, तसा तो गावातला पहिला अॅक्टर… याचा आम्हाला अभिमान आहे. यानंतर बाबांचा माझ्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला, हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.

सुलभाताईंची दाद लाखमोलाची

अस्मिता केंद्रात ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी माझे खूप कौतुक केले. तुझे डोळे खूप बोलके आहेत, ही त्यांची दाद खूप महत्त्वाची होती. पुढे जाऊन डोळय़ात तरळणारे हेच भाव अभिनयात उतरवायचे आहेत असे बळ त्यांनी दिले.

हीच कामाची पोचपावती

मालिका, चित्रपटानंतर आता वेब सीरिज. खूप धम्माल येणार होती, पण अगदी माझ्याविरुद्ध असणारी रावसाहेब ही भूमिका मी केली आहे. यासाठी उत्कृष्ट शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि नजरेची एकाग्रता यावर तीन महिने मी काम करत होतो. आता मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद ही कामाची पोचपावती आहे.