
माणसं व्यवसायाची निवड करताना जो व्यवसाय उत्तम चालेल हे बघून निवडतात आणि व्यवसायाची सुरुवात करून येणाऱ्या अनुभवातून शिकत असतात. या कल्पनांना छेद देणारे एक प्रकाशक भेटले ते सुनिधी पब्लिशर्सचे अविनाश काळे.
प्रकाशन व्यवसाय एकेकाळी पुण्या-मुंबईत प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देणारा होता. पण हे चित्र बदलले, कारण वाचन संस्कृतीला उतरती कळा लागली. तरीही या व्यवसायात अविनाश काळे यांनी स्वेच्छेने प्रवेश केला. याला कारणसुध्दा तसंच होतं. त्यांच्या वडिलांचे मुद्रणालय आणि कंपोजिंग युनिट होते आणि काळे यांना पुस्तकांची आवड होती. त्यामुळे त्यांनी नोकरी धरतानाही हा विचार मनात ठेवला व शासकीय मुद्रणालय येथे लेखकांच्या साहित्याच्या मूळ कॉपी तपासण्याचे काम करत होते. यातून त्यांचा सतत पुस्तकांची संपर्क आला. पुस्तक कसं असावं याचा बऱ्यापैकी अंदाज आला आणि अशी पुस्तकं आपणच प्रकाशित केली पाहिजे ही खूणगाठ मनाशी बांधली. म्हणजे व्यवसायातील सगळ्या गोष्टी शिकून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली असं म्हणणं योग्य होईल. म्हणूनच प्रकाशकाला सगळ्या तांत्रिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकंही कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, पर्यटन याहून वेगळी आहेत. किंबहुना आपण यालाच ’साहित्य’ समजतो व इतर साहित्य म्हणजे डॉक्टरांनी लिहिलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातले लेखन हे साहित्य नाही का? त्याला साहित्य न समजणं हा त्यांच्यावर अन्याय नाही का? असं स्पष्ट मत काळे यांनी मांडले. संशोधनातून उत्तम संदर्भ साहित्य ग्रंथ तयार करणारा साहित्यिकच असतो. सामाजिक शास्त्र्ाs हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या शास्त्र्ााचे संदर्भ मूल्य वाचकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी पारंपरिक लोकप्रिय साहित्य प्रकाशनाने भर दिला नाही. सामाजिक शस्त्र्ाांवरचे इंग्रजी साहित्य विपुल आणि दर्जेदार आहे आणि ते त्यांना मराठीत आणावेसे वाटले. 1985 पूर्वी संदर्भ साहित्यावरून अभ्यास केला जात असे. परंतु त्यानंतर क्रमिक पुस्तके आली.
बदलत्या काळात वाचकांची आवड बदलली व या संदर्भ ग्रंथांना सामान्य वाचकही मिळू लागला. परंतु ती पुस्तके त्या वाचकांच्या भाषेत मांडली गेली पाहिजेत यासाठी काळे यांनी विशेष काळजी घेतली. यातल्या टेक्निकल टर्मस् वेगळ्या भाषेत मांडल्या.
त्यांनी मांडलेला एक मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा की, या पुस्तकांसाठी वाचकवर्ग निर्माण करताना पुस्तकाने वाचकांकडे गेलं पाहिजे. यासाठी त्यांनी पुस्तक प्रदर्शनं गावोगावी भरवली. विद्यार्थी वर्गापर्यंत ही पुस्तके पोहोचलीच पाहिजेत व इतरही वाचकांना त्याचा लाभ घेता यायला हवा. या प्रदर्शनाला त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या पुस्तकांचा वाचक केवळ महानगरात नाही तर इतरत्रही आहे, हे निरीक्षण त्यांनी आवर्जून नोंदवलं. प्रदर्शनाबरोबरीने शिक्षणाचा वाढता प्रसार, वाचकांची बदललेली अभिरुची याचाही पुस्तक विक्रीसाठी खूप उपयोग झाला. येत्या काळात अशा पुस्तकांची गरज वाढतच जाईल. कारण येणाऱ्या पिढय़ांना काय वाचायला आवडेल याचा विचार करून पुस्तके काढावी लागतील. तर हा विचार केल्यास या व्यवसायाला उत्तम भवितव्य आहे.
पुस्तक विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर चांगला करून घेतला. कारण सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. याचा त्यांनी योग्यप्रकारे वापर केला, करत आहेत. त्यामुळे पुस्तकं खपत नाहीत अशी तक्रार ते करत नाहीत. कोविडच्या काळातही त्यांनी सोशल मीडियावर पुस्तकांचा परिचय टाकला व वाचकांची मागणी पूर्ण केली. यामुळे त्यांना इतर राज्यांतील वाचकही मिळाला. बाहेरच्या राज्यात सुनिधीला वाचक मिळाले.
सुनिधीने बालसाहित्य प्रकाशित केले आहे तेही काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून. मुलांच्या हातात सकस वाचन दिलं तर मोठेपणी त्यांची वाचनाची आवड जोपासली जाईल व उद्याचे वाचक घडतील.
सुनिधीने आजपर्यंत राज्यशास्त्र्ा, समाजशास्त्र्ा, अर्थशास्त्र्ा, मानसशास्त्र्ा, याशिवाय संशोधन, डिफेन्स स्टडीज, लोकप्रशासन या विषयावरची उत्कृष्ट पुस्तके मराठीत आणली. अशा प्रयत्नातून वाचन संस्कृती पूर्वीसारखी वाढेल यात शंकाच नाही.
>> डॉ. नीलम ताटके





























































