ठसा – वैद्यकीय सेवाव्रती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– प्रदीप म्हात्रे

ग्रेट ब्रिटन व आयर्लंड इनरव्हील या संस्थांची स्थापना मार्गारेट गोल्डिंग यांनी 1924 मध्ये केली. पहिल्या महायुद्धात त्यांनी परिचारिकेचे काम केले होते; त्याशिवाय अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचे योगदान होते. मार्गारेट गोल्डिंग यांच्या नावे इनरव्हील संस्था 2000 सालापासून हे पुरस्कार देत आहे. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे भरीव काम करणाऱया महिलांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावेळी हा पुरस्कार मुंबईच्या डॉ. विनोदिनी प्रधान यांना जाहीर झाला आहे.

मुंबईच्या डॉ. विनोदिनी प्रधान यांना यंदाचा मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या पुटुंबात 1935 मध्ये डॉ. विनोदिनी प्रधान यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. शिक्षणाला प्राधान्य देणाऱया पुटुंबात तसेच नातेवाईकांमध्ये अनेक व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने त्या वैद्यकीय क्षेत्राकडे वळल्या नसत्या तरच नवल होते. सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यादरम्यान त्यांनी काही पुरस्कार मिळवत शिष्यवृत्त्याही पटकावल्या. 1960 मध्ये डॉ. शशिकांत प्रधान यांच्याशी विवाह झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला; जो 55 वर्षे सुरू राहिला. वैद्यकीय व्यवसाय करताना एकीकडे काwटुंबिक जबाबदारी सांभाळणे आणि सामाजिक कार्यात योगदान देणे तसे सोपे काम नाही. मात्र वेळेचं उत्तम व्यवस्थापन करत डॉ. विनोदिनी यांनी ते साध्य केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी शासकीय उपक्रमात भाग घेत संतती नियमनाचे महत्त्व घरोघरी जाऊन पटवून देत स्त्रियांना त्याकरिता उद्युक्त केले. स्त्राr चेतना या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पीडित महिलांकरिता समुपदेशनाचे काम केले. मराठा मंदिर या संस्थेकरिता संस्कारशास्त्रावर शिबिरे घेतली. डॉ. मृणाल गोरे यांच्या स्वाधार संस्थेच्या चेंबूर शाखेच्या अध्यक्ष या नात्याने वैद्यकीय मदत पुरवली. हिंदुस्थान सरकारच्या नॅशनल एड्स कमिटीच्या सभासद म्हणून मुंबईच्या सुमारे 40 महाविद्यालयांत कार्यशाळा घेतल्या. पुष्ठरोग निवारण समिती (शांतिवन) या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱया आदिवासी शाळेकरिता आरोग्य तपासणी शिबिरे घेतली तसेच बोअरवेल आणि शाळा इत्यादी सुविधांकरिता निधी उभारणी केली. त्याव्यतिरिक्त पुष्ठरोगमुक्त व्यक्तींना स्वबळावर रोजगार मिळवता यावा यादृष्टीनेही प्रयत्न केले. हे सर्व करताना शक्य तेव्हा वैद्यकीय विषयावर प्रासंगिक लिखाण केले. डॉ. विनोदिनी प्रधान यांची चेंबूर महिला समाज येथील कारकीर्द फार मोठी राहिली आहे. कमलताई तासकर यांच्या आग्रहामुळे त्या चेंबूर महिला समाज या संस्थेच्या कार्यात ओढल्या गेल्या. चेंबूर परिसर पालथा घालून महिलांना एकत्र करीत 6 फेब्रुवारी 1962 रोजी संस्थेची स्थापना केली. तेथेच 35 वर्षांपूर्वी काम करणाऱया महिलांसाठी वसतिगृह बांधून घेतले. त्यासाठी त्यांनी शासनाचे अनुदानही मिळवले. तेथील महिलांसाठी कायमस्वरूपी भोजनव्यवस्थेची सोय करीत सर्वसामान्यांकरिताही स्वस्त दरात भोजन उपलब्ध केले. त्याद्वारे संस्थेलाही आर्थिक उत्पन्न तर मिळत राहिले, त्याशिवाय ज्या गरजू महिलांमार्फत ही व्यवस्था चालवली, त्यांनाही उत्पन्न मिळू लागले. त्याव्यतिरिक्त महिलांकरिता सौंदर्य प्रसाधने, मोत्यांचे दागिने बनविणे, कागदी पिशव्या बनविणे अशा विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते; ज्यामुळे महिलांना स्वबळावर रोजगार मिळवणे शक्य होते. मुलींना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची सोय संस्थेतर्फे करण्यात आली. संस्थेच्या इमारतीत सभागृहांची सोय केल्यामुळे संस्थेला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. डॉ. विनोदिनी प्रधान यांचे यजमान डॉ. शशिकांत हे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याशी जोडलेले होते. त्यांनाही समाजकार्यासह इतर अनेक कलांची आवड होती. त्यामुळे साहजिकच त्यांच्या सामाजिक कार्याला घरून प्रोत्साहन मिळत गेले. कोरोना काळात त्यांनी मुंबईतील रुग्णालयांना प्लस ऑक्सीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, फेस शील्ड एन-95 मुखपट्टय़ा पुरवल्या. वैद्यकीय सेवाव्रती म्हणून डॉ. विनोदिनी यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार ही याच कार्याची पोचपावती आहे.