नशा ई-सिगारेटची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश मोरे

‘इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टम’ अंतर्गत (ईएनडीएस) असलेल्या ‘ई-सिगारेट’, ‘ई-हुक्का’सारख्या धूम्रपानाच्या साधनांचा तरुण पिढीकडून मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्याचे दिसून येते. ई-सिगारेट हे तारुण्याला पोखरणारे आधुनिक उपकरणातील विषच. अलीकडच्या काळात ‘ई-सिगारेट’चा वापर काढल्याने डॉक्टरांसाठीही हा एक चिंतेचा विषय बनलाय. याच चिंतेतून 24 राज्यांतील 1061 डॉक्टरांनी ई-सिगारेटवर बंदी घालण्यासाठी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करायची तर हातात सिगारेटचे थोटूक असलेच पाहिजे हा एक अलिखित नियम बनलाय. किंबहुना, ’मॉडर्न लाइफस्टाइल’चा भाग. सिगारेट तरुणाईला आपल्या मॉडर्न चेहऱ्यावरचा दागिना वाटतेय. गोऱयागोमटय़ा चेहऱ्याला वरकरणी हा दागिना शोभत असेलही; पण तो शरीर खंगून टाकतोय हे कोण लक्षात घेणार? एकावर एक पॅक संपवताना आपण स्वतःलाच संपवत चाललोय हे कधी कळणार? हे कमी म्हणून की काय, आता ई-सिगारेटची नशा हवीहवीशी वाटतेय. नशेखोरीचे नाना प्रकार जन्माला घातले जाताहेत. त्या प्रकारांना आपण पोसतोयही. हळूहळू पाय रोवणारी ई सिगारेटदेखील याच कुळातील.

ई-सिगारेट आरोग्याला घातक आहे, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला. आठवडा उलटत नाही तोच मुंबई हायकोर्टाने ई-सिगारेट ’ड्रग्ज’च्या कक्षेत मोडत नाही, असा निर्णय दिला. ई-सिगारेटच्या उत्पादकांना या निर्णयाने दिलासा मिळाला खरे, पण आपण अशा व्यवसायातून नेमके काय कमावतोय याचा उत्पादकांनी विचार करायला नको का? ई-सिगारेट हे तारुण्याला पोखरणारे आधुनिक उपकरणातील विषच. अलीकडच्या काळात ’ई-सिगारेट’चा कापर काढल्याने डॉक्टरांसाठीही हा एक चिंतेचा विषय बनलाय. याच चिंतेतून 24 राज्यांतील 1061 डॉक्टरांनी ई-सिगारेटकर बंदी घालण्यासाठी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टम’ अंतर्गत (ईएनडीएस) असलेल्या ‘ई-सिगारेट’, ‘ई-हुक्का’सारख्या धूम्रपानाच्या साधनांचा तरुण पिढीकडून मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ई-सिगारेट’, ई-सिग, व्हेप्स, ई- हुक्काज, व्हेप पेन्स या सर्क साधनांचा ‘इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिक्हरी सिस्टम’मध्ये समाकेश होतो. यावर बंदी घालण्याची नितांत गरज आहे. काही ई-सिगारेट हे नियमित सिगारेट, सिगार, पाइपसारखे दिसतात. तरुण या ई-सिगारेटच्या मोहजालात कधी अडकतात हेच कळत नाही.
बराच वेळ स्वतःला ’ऑनलाइन’ ठेवणारी तरुण पिढी ई-सिगारेटदेखील ऑनलाइनच मागवतेय. धक्कादायक बाब म्हणजे, ई-सिगारेटच्या आहारी गेलेल्या 10 वर्षांखालील विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या 15 वर्षांत 26 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर गेले आहे. पूर्वी केवळ धनिकांपुरती व्यसनाची हौस भागवणारी ई-सिगारेट हल्ली कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास दिसते. ई -सिगारेटचं थ्रिल, नशा आणि सोशल मीडियावरील प्रसार तरुणाईला वेगाने आकर्षित करत आहे. हिंदुस्थानात ई-सिगारेटचे 30 ते 50 टक्के मार्केट ऑनलाइन आहे. ही ई-सिगारेट 850 रुपयांपासून उपलब्ध होते. एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय ई-सिगारेट कंपन्यांना हिंदुस्थानात पाय ठेवू देत नाहीय. असे असतानाही गेल्या तीन वर्षांत 36 बॅण्डस्कडून ई-सिगारेटचा बेकायदा व्यवसाय केला गेल्याची माहिती नुकतीच पुढे आली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगातील 12 टक्के धूम्रपान करणारे लोक हिंदुस्थानात आहेत. धूम्रपान करणाऱ्या लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थानचा चीनच्या खालोखाल क्रमांक आहे. याचा अभिमान वाटायला नकोच मुळी. चीन आजच्या घडीला धूम्रपानात पुढे असेलही, पण ही स्थिती वेळीच बदलण्यासाठी तेथे पावले टाकली जाताहेत. तेथे राष्ट्रीय आरोग्य धोरणविषयक मसुदे व नियमांच्या अंमलबजावणीचे काम करणाऱया ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ने ई-सिगारेटवर संशोधन सुरू केले आहे. आम्हाला धूम्रपानाचे प्रमाण कमी करायचेय, तरुणांना तंबाखू सेवनापासून रोखायचेय, असा निर्धार कमिशनच्या नियोजन विभागाचे प्रमुख माओ कुनान यांनी केला आहे. धूम्रपान करणाऱ्या सर्वाधिक लोकसंख्येला नवीन व्यसनाच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न आहे. चीनमध्ये 30 कोटींहून अधिक लोक तंबाखूयुक्त धूम्रपान करतात. ही संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एकतृतीयांश आहे. आता आपला हिंदुस्थान याच गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करतोय. आपण हा धोका का ओढवून घेतोय? कळतेय पण वळत नाही, अशी मानसिकता का झालीय? केंद्र सरकारने ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदीचा विचार केलाय. मे महिन्यात ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने(आयसीएमआर) इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम्सवर (ईएनडीएस) बंदीचे समर्थन केले. त्यानंतर केंद्र सरकार ई-सिगारेट बंदीसाठी अनुकूल झालेय. काही राज्यांमध्ये ई-सिगारेटवर बंदी आहे. उर्वरित राज्यांमध्येही ही बंदी लागू व्हायला हवी, जेणेकरून आपल्या हिंदुस्थानचे तारुण्य निरोगी राहील. आपण चीनला प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकू, व्यसनाधीनतेमध्ये नको! न्यूझीलंडने 2025 पर्यंत देश धूम्रपानमुक्त करण्याची शपथ घेतलीय. आपणही याच दिशेने पावले टाकूया, शपथ घेऊया.. धूम्रपानमुक्त हिंदुस्थानची!

[email protected]