ट्विटरच्या चिमणीला नवे घरटे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनीता मोकाशे

जगभरातील समाजमाध्यमांमध्ये आघाडीवर असणाऱया ‘ट्विटर’च्या चिमणीला आता अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या रुपाने नवे घरटे मिळाले आहे. तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजून मस्क यांच्याकडून ट्विटरची खरेदी केली जाणार आहे. ट्विटर ही समाजमाध्यमांच्या क्षेत्रातील फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या समकालीन स्पर्धकांपेक्षा बहुलोकप्रिय असली तरी आर्थिक ताळेबंदांच्या पटलावर ती फायद्यात नसल्याचे सांगितले जाते. असे असताना मस्क यांनी ती खरेदी करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून या व्यवहारात दडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. या शोधमोहिमेत या व्यवहाराचे कनेक्शन थेट चीनपर्यंत पोहोचले आहे.

जगातील अब्जाधिशांच्या आणि सर्वांत श्रीमंतांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणाऱया एलॉन मस्क यांनी समाजमाध्यमातील अग्रणी कंपनी असलेल्या ‘ट्विटर’ची 44 अब्ज डॉलर्सना खरेदी करून एका अर्थाने जगालाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. धक्का म्हणण्याचे कारण म्हणजे याच ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तपणाने मते मांडण्याचा अधिकार याबाबत एलॉन मस्क यांनी टीका केलेली होती. दुसरीकडे ट्विटर ही समाजमाध्यमांच्या क्षेत्रातील फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या समकालीन स्पर्धकांपेक्षा बहुलोकप्रिय असली तरी आर्थिक ताळेबंदाच्या पटलावर ती फायद्यात नसल्याचे सांगितले जाते. असे असताना मस्क यांनी ती खरेदी करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून या व्यवहारात दडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. मस्क आणि ट्विटर यांच्यातील व्यवहार पूर्ण होण्यास बराच काळ लागणार आहे. पण तोपर्यंत मस्क यांच्या या निर्णयावर बरीच चर्चा होत राहणार आहे. विशेषतः मस्ककडे ही पंपनी आल्याने भविष्यात काय बदल होईल, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

हिंदुस्थानातही याची उत्सुकता आणि चर्चा अधिक दिसून येईल. कारण देशातील जवळपास सर्व राजकारणी, समाजकारणी, कलाकार, शासन-प्रशासनातील अधिकारी इतकेच नव्हे तर प्रख्यात संत-महंत, देवस्थाने यांचीही ट्विटरवर खाती आहेत आणि त्यांचे लाखो-करोडो ‘फॉलोअर्स’ही आहेत. दुसरीकडे ट्विटरबाबत अलीकडील काळात काही वादही झडलेले दिसून आले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट आणि विधानांची दखल घेत पेंद्र सरकारने काही ट्विटर हँडल्स काढून टाकण्याचे आदेश दिले होते. परंतु ट्विटरने सरकारचे आदेश बेकायदा असल्याचे सांगून कारवाई करण्यास नकार दिला होता. ही कारवाई हिंदुस्थानात असलेल्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात असल्याचे ट्विटरचे म्हणणे होते. एलॉन मस्क हा एक ‘फ्री स्पीच एब्सोल्युटिस्ट’ म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध, अंकुश ठेवण्याच्या विरोधात आहे. परंतु त्याने कोणत्याही देशाचे कायदे मोडणार नाही आणि त्याचे पालन केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. तथापि, येणाऱया काळात जेव्हा सरकार एखाद्या प्रकरणात कारवाईचा आदेश देत असेल आणि तो ट्विटरला लागू होत असेल तर अशा बाबतीत मस्कची किंवा ट्विटरची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

याबाबत नायजेरियाचे उदाहरण पाहूया. ट्विटरवरून नायजेरिया सरकारच्या विरोधात भूमिका मांडली जात होती तेव्हा तेथील सरकारकडून यावर आक्षेप घेतला जात होता. तेथील सरकारने यावर कारवाईचे निर्देश दिले; परंतु ट्विटरने या आदेशांचे पालन केले नाही. परिणामी तेथील सरकारने काही काळासाठी नायजेरियामध्ये ट्विटरवरच फुली मारली. भविष्यात अशी स्थिती निर्माण झाली तर एलॉन मस्क याविरोधात लढतील का? की ते ट्विटरला त्या देशातून बाहेर काढतील?

असे म्हटले जाते की ट्विटर हे एक टाऊन स्क्वेअर म्हणजेच एक डिजिटल चौकोन असून इथे लोकशाही व्यवस्था आहे. त्यामुळे या समाजमाध्यमावर कोणताही व्यक्ती आपले म्हणणे मोकळेपणाने मांडू शकतो. काही वर्षांपूर्वी कुख्यात दहशतवादी संघटना इसिसने ट्विटरवर खुलेआम खाते उघडले होते आणि जगभरात अपप्रचार सुरू केला होता. एलॉन मस्कचा विचार पाहता इसिससारख्या संघटना सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय होतील का, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. याप्रमाणे अमेरिकेत ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिला जातो, त्याला हिंदुस्थानात मान्यता मिळेलच असेल नाही. त्यामुळे ट्विटरमध्ये कसा बदल होईल आणि काय बदल होतील, असा प्रश्न आहे. एलॉन मस्क हा टेक फाउंडर आहे आणि त्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर अनेक पंपन्या स्थापन केल्या आहेत. अशा लोकांविषयी एक प्रतिमा निर्माण झालेली असते ती म्हणजे ते कोणत्याही समस्येचे निराकरण तंत्रज्ञानाच्या साह्याने करत असतात. याबाबत बॉट्सच्या समस्येकडे पाहिले जाईल आणि ती संपवण्याची घोषणा एलॉन मस्कने केली आहे. बॉट्सला नियंत्रित करणे ही एक मोठी तांत्रिक समस्या आहे. त्यामुळे ट्विटरवर जे हेट स्पीच म्हणजेच द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक भाषणे आहेत त्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल, हे पाहावे लागेल. हे आव्हान हिंदुस्थानसाठी खूपच गंभीर आहे. कारण आपल्या देशात ट्विटरच नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप यांसारख्या सोशल मीडियावर एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी ट्रोलर्सची फौजच दिसून येते. अशा आव्हानांचे निराकारण तांत्रिक रुपातून कसे होऊ शकते, असा प्रश्न आहे. कारण ही एक समाजशास्त्र्ााrय समस्या आहे.

एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील करार हा महत्त्वाचा असून त्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. या कराराने सोशल मीडिया इकोसिस्टीमवर लगेच परिणाम होणार नाही. जो काही फरक पडेल, तो एक पंपनी म्हणून ट्विटरवर पडेल. आतापर्यंत ती एक पब्लिक पंपनी होती आणि त्याच्यावर सार्वजनिक जबाबदारी होती. परंतु या करारानंतर ती खासगी पंपनी होईल. विशेष म्हणजे ट्विटरने काही वर्षात हेट स्पिच आणि फेक न्यूज रोखण्यासाठी बरेच काम केले आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर जाहिराती वाढल्या आहेत. ज्या व्यासपीठावर वादग्रस्त विधानांचा बोलबाला असतो किंवा आक्षेपार्ह विधाने शेअर केली जातात तेथे जाहिरातदार फिरकत नाहीत. ते आपल्या उत्पादनाला नकारात्मकता जोडू इच्छित नाहीत. ट्विटरने आपल्या व्यासपीठावर अशा गोष्टींना फाटा दिला आहे. पण अलॉन मस्क यांच्या अधिपत्याखाली गेल्यानंतर हीच स्थिती राहील का, हे येणारा काळच ठरवेल.

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो समाजावर प्रभाव पाडू शकणाऱया समाज माध्यमाचे नियंत्रण जगातील एका अब्जाधीश व्यक्तीच्या हाती जाणार आहे. आज ट्विटरसारखे समाजमाध्यम समाजातील मतप्रवाहांचे प्रतिबिंब उमटवण्यात आघाडीवर असले तरी याचाच आधार घेत किंबहुना वापर करून घेत समाजमनाला आपल्या ईप्सितानुसार, इच्छेनुसार दिशादर्शन करण्याचे प्रयत्नही झाले आहेत. तसेच या समाजमाध्यमाचा आवाका आणि ताकद मोठी असल्यामुळे अशा दिशादर्शनामुळे अनेकांना आपल्या भूमिकाही बदलाव्या लागल्या आहेत. राजकीय क्षेत्रात तर ट्विटरसारख्या समाजमाध्यमाचा वापर करून घेऊन नॅरेटिव्ह तयार करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. ही बाब मस्क यांनी ओळखली नसेल असे म्हणता येणार नाही. किंबहुना ही ताकदच त्यांना ट्विटर खरेदी करण्यास प्रोत्साहित करून गेली असल्यास नवल वाटायला नको. कारण विचारसरणी नियंत्रण किंवा विचारसरणीला दिशादर्शन याचा थेट संबंध ‘सत्तेशी’ असतो, हे कटूसत्य आहे.

ट्विटर खरेदीबाबत अशा प्रकारच्या अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांनी तर मस्क आणि ट्विटर यांच्यातील व्यवहाराचा संबंध चीनशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. एलॉन मस्क यांची बहुचर्चित टेस्ला कारच्या व्यवसायाचे चीनवरील अवलंबित्व मोठे आहे. 2022मध्ये टेस्लाने चीनमधून 4.65 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. चीनमध्ये टेस्ला कारचा उद्योग 52.8 टक्क्यांनी वाढला आहे. टेस्लाला मिळणाऱया एकूण उत्पन्नापैकी 24 टक्के वाटा एकटय़ा चीनचा आहे. टेस्लाच्या बॅटरीसाठी लागणाऱया कच्च्या मालाचा पुरवठा चीनकडून केला जातो. टेस्लाचा परदेशातील पहिला कारखाना चीनमध्येच सुरू करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीमुळे मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीन कनेक्शन नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन माध्यमांमध्ये, हॉलीवूडमध्ये चीनकडून केल्या जात असणाऱया प्रचंड गुंतवणुकी जगज्ञात आहेत. आता ‘ट्विटर’मध्येही अप्रत्यक्षपणे चीनच शिरकाव करत नाहीये ना, हा प्रश्न अनाठायी म्हणता येणार नाही.